अहमदाबाद येथील पाऊस धोनीसाठी फायदाचा ठरू शकतो किंवा पाऊस पाहिल्यानंतर धोनी मनातल्या मनात खुश झाला असेल असे म्हणण्याचे कारण समजून घ्यायचे असेल तर १० वर्ष मागे जावे लागले. २०१३ च्या २३ जून रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच होणार होती. मॅचच्या आधी पाऊस सुरू झाला आणि बराच वेळ मॅच सुरू झाली नाही. अखेर प्रत्येकी २० ओव्हरची मॅच खेळवण्याचा निर्णय झाला. प्रथम फलंदाजी करत भारताने फक्त १२९ धावा केल्या. टीम इंडियाने केलेल्या धावा पाहता इंग्लंडचा विजय पक्का वाटत होता.
धोनीची जादू चालली
इंग्लंडने त्यांच्या डावाला सुरुवात केली आणि त्यांना अखेरच्या १८ चेंडूत २८ धावांची गरज होती. अशात धोनीने ईशांत शर्माच्या हातात चेंडू दिला. ईशानने दुसऱ्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर मात्र त्याने पुढील दोन चेंडूवर इयोन मॉर्गन आणि रवी बोपारा यांना बाद केले. हे दोन्ही कॉच अश्विनने घेतले. ते देखील वेगवेगळ्या ठिकाणी फिल्डिंग करताना. ही धोनीची फ्लिडिंग लावण्याची कमाल होती. त्यानंतर अखेरच्या दोन ओव्हरमध्ये धोनीने जलद ऐवजी फिरकीपटूंना आणले. रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्या समोर इंग्लंडचे फलंदाज अपयशी ठरले आणि भारताने ही लढत ५ धावांनी जिंकली. हा अखेरचा क्षण होता जेव्हा भारताने आयसीसीची ट्रॉफी जिंकली.
२०१० ची चॅम्पियन्स लीग सेमीफायनल
२०१०च्या चॅम्पियन्स लीगच्या सेमीफायनलची लढत पावसामुळे प्रभावीत झाली होती. तेव्हा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आरसीबी होती. पावसात दोन्ही संघांना प्रथम गोलंदाजी करायची असते. पण धोनीला फलंदाजी करायची होती. चेन्नईने त्या लढतीत १७४ धावा केल्या. सुरेश रैनाने ९४ धावांची नाबाद खेळी केली. मग धोनीच्या नेतृत्वाची जादू दिसली. आरसीबीला फक्त १२३ धावा करता आल्या. त्यानंतर फायनलमध्ये देखील चेन्नईने बाजी मारली होती.
अहमदाबादेत सीएसके होणार चॅम्पियन
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज पाचव्या विजेतेपदाासाठी मैदानात उतरेल. गेल्या वर्षी गुणतक्त्यात ९व्या स्थानावर राहिलेल्या चेन्नईचा संघ यावेळी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी क्वॉलिफायर १ मध्ये गुजरातचा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला. आता पुन्हा एकदा हे दोन संघ समोरा समोर आले आहेत. दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्स घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More