अहमदाबाद: आयपीएल २०२३च्या हंगामाची फायनल मॅच राखीव दिवशी म्हणजेच आज २९ मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अशी फायनल मॅच होत आहे जी निश्चित तारखेला नव्हे तर रिझर्व डे दिवशी खेळवली जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल २८ मे रोजी फायनर होणार होती. मात्र पावसामुळे टॉस देखील झाला नाही.या हंगामात अहमदाबादच्या पिचवर जोरदार फलंदाजी झाली आणि धावा देखील भरपूर निघाल्या. गुजरातचा आक्रमक सलामीवीर शुभमन गिलने या मैदानावर सलग दोन शतक झळकावली आहेत. त्याच्या आधी त्याने नाबाद ९४ धावांची खेळी केली होती. यामुळे हे स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी मैदानावर धावांचा पाऊस पडतो. अंतिम सामन्यात देखील धावा होण्याची शक्यता आहे. मात्र कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे खेळपट्टीत थोडी ओल असेल आणि सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण खेळपट्टीत ओल असल्यामुळे फिरकीपटूना फार वाव असेल असे दिसत नाही.

पावसानंतर धोनीने नेतृत्व होते अधिक धोकादायक; IPL फायनलपूर्वी जाणून घ्या विजेतेपदाचा फॅक्टर
आजचे हवामान कसे आहे?

CSK vs GT: फायनल मॅच होण्याआधीच ठरला IPL 2023 विजेता; समोर आले चॅम्पियन संघाचे नाव


अहमदाबादमध्ये काल जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सोमवारी देखील पावसाची शक्यता आहे. अर्थात काल ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस अनुभवला तसा आज असणार नाही हाच थोडा फार दिलासा म्हणावा लागले. संध्याकाळी ढग असतील मात्र पावसाची शक्यता फक्त १० टक्के इतकी आहे. दिवसाचे तापमान किमाल ३८ डिग्री असेल तर मॅच दरम्यान ३० ते ३३ डिग्रीच्या दरम्यान असेल.

जिद्दीला सलाम! एका छत्रीत ६ जण, मुसळधार पावसात हार मानली नाही; IPL फायनलच्या खऱ्या हिरोंचे कौतुक
दरम्यान जर आजच्या दिवशी पावसामुळे सामना झाला नाही तर मात्र चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसू शकतो. कारण आयपीएलच्या नियमानुसार जर फायनल मॅच झालीच नाही तर साखळी फेरीतील गुणतक्त्यात ज्या संघाला सर्वाधिक गुण होते त्याला विजेता म्हणून घोषीत केले जाईल. यानुसार गुजरात टायटन्सला मॅच न खेळता विजेता जाहीर केले जाईल. गुणतक्त्यात गुजरात अव्वल स्थानी तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर होता.

मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here