१) राखीव दिवशी कशी सुरू होते मॅच
राखीव दिवस हा वनडे किंवा टी-२० लढतींच्या सेमीफायनल आणि फायनल मॅचसाठी ठेवला जाते. अर्थात यासंबंधिचे नियम वेगवेगळे आहेत. टी-२० वर्ल्डकप सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला जातो. या शिवाय अन्य खास मालिकेत देखील असा राखीव दिवस ठेवला जातो. ज्या दिवशी पाऊस पडतो आणि सामना अर्धवट राहतो तो पूर्ण करण्यासाठी त्याच्या पुढील दिवस हा राखीव असतो.
२) राखीव दिवशी कोठून सुरू होते मॅच
निश्चित दिवशी जर मॅचमधील काही ओव्हर शिल्लक असतील तर पुढील दिवशी सामना तेथून सुरू होतो जेथे थांबला होता. जर मॅचची एक ही ओव्हर झाली नसेल तर सामना नव्याने सुरु केला जातो. राखीव दिवशी देखील पाऊस पडला तर मॅच उशिरा सुरू केली जाते. पण त्यानंतर देखील पाऊस सुरू असेल तर ओव्हर्समध्ये कपात केली जाते. यासाठी कट ऑफ नियम वापरला जातो.
३) कट ऑफ टाइमचा नियम काय
राखीव दिवशी कट ऑफ टाइमच्या नियमात कोणताही बदल होत नाही. जर निश्चित वेळेत मॅच झाली नाही तरी सामना २० ओव्हरचा होऊ शकतो. रात्री उशीरापर्यंत मॅच सुरू होऊ शकली नाही तर ९.३५ नंतर ओव्हरमध्ये कपात होण्यास सुरुवात होते. यानंतर जरी पाऊस पडत राहिला तर ५ ओव्हरची मॅच खेळवण्याचा विचार केला जाईल. या परिस्थितीत एका संघाने ५ ओव्हर खेळली आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर तेव्हा डकवर्थ लुईस नियम लागू होईल.
४) काय सांगतो डकवर्थ लुईस नियम
डकवर्थ लुईस नियम समजून घेणे थोड कठिण आहे. यात दोन गोष्टींचा विचार केला जातो. एक तर शिल्लक ओव्हर आणि दुसरी म्हणजे शिल्लक विकेट होय. याचा विचार करून एखादा संघ धावांची गती कमी जास्त करू शकतो. कारण डकवर्थ लुईस नियमात दोन गोष्टींच्या आधारे निर्णय दिले जातात. यासाठी एक टेबल देखील तयार करण्यात आले आहे.
५) प्रत्येकी ५ ओव्हरच्या मॅचचा नियम काय आहे
जास्त पाऊस झाला आणि सामना खेळवण्यास उशिर झाला तर २० ओव्हर कमी केल्या जातात आणि त्या कमीत कमी ५ ओव्हर केल्या जाता. मॅच ४० ओव्हरची असते पण कमीत कमी १० ओव्हरची मॅच व्हावी असा नियम आहे. तेही शक्य झाले नाही तर एका डावात किमान ५ ओव्हर व्हावेत असा नियम आहे. जर पाच ओव्हर देखील झाल्या नाही तर सुपर ओव्हरचा विचार केला जातो.
६) सुपर ओव्हरचा निर्णय कसा घेतला जातो
जर वाटत असेल की मॅच १० मिनिटांची देखील होऊ शकते तेव्हा सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला जातो. दोन्ही संघांना प्रत्येकी एक ओव्हर खेळण्यास मिळते. त्याच जो संघ विजयी होतो त्याला विजेतेपद मिळते. सुपर ओव्हरमध्ये मॅचचा निकाल लागला नाही तर आयपीएलमध्ये कोण विजेता होईल याचा निर्णय याआधी झालेल्या मॅचच्या आधारावर घेतला जातो
७) एकाही ओव्हर झाली नाही तर…?
जर राखीव दिवशी मॅच झालीच नाही तर साखळी फेरीत जो संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी असतो त्याला विजयी घोषीत केले जाते. याचा अर्थ सध्याच्या परिस्थितीत गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More