जडेजाच्या बॅटमधून चौकार येताच डगआऊट मध्ये बसलेले चेन्नईचे सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष करत मैदानात प्रवेश केला. चेन्नईचे सर्व खेळाडू आणि स्टाफ यांना फक्त एकाच व्यक्तीसोबत जल्लोष करायचा होता, तो म्हणजे विजयाचा हिरो रविंद्र जडेजा होय. पण जडेजाच्या मनात मात्र विजयानंतर पहिली भेट ज्याची घ्यायची होती ती व्यक्ती खास होती.
अखेरच्या चेंडूवर त्याने चौकार मारला आणि जल्लोष करत हवेत उडी मारली. त्यानंतर तो थेट चेन्नई सुपर किंग्जच्या डगआउटकडे पळत गेला. त्याच्या वाटेत जे त्या सर्वांना त्याने चकवा दिला आणि जडेजा थेट धोनीला जाऊन भेटला. धोनीने जडेजाला मिठीत घेऊन उचलून घेतले.
फायनल मॅचमध्ये धोनी पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. अंतिम सामन्यात अशा पद्धतीने बाद झाल्याची निराशा धोनीच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण विजय मिळवल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने जडेजाला मिठी मारली आणि उचलून घेतले त्यावरून त्याला किती आनंद झाला याचा अंदाज येतो. धोनीचे असे रुप याआधी कधीच पाहिले नाही.
चेन्नईकडून धोनी वगळता सर्व फलंदाजांनी विजयात योगदान दिले. जडेजाने ६ चेंडूत नाबाद १५, शिवम दुबेने २१ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. या शिवाय कॉन्वेने ४७, गायकवाडने २६, अजिंक्य रहाणेने २७ आणि रायडूने १९ धावांचे योगदान दिले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More