अहमदाबाद : आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पर्वाच्या विजेतेपदावर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपरकिंग्ज नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सचा पराभव केला. पावसाचा व्यत्य आल्यानं डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं धावसंख्या कमी करण्यात आली होती. गुजरातनं पहिल्यांदा फलंदाजी करताना साई सुदर्शन, वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलच्या खेळीच्या जोरावर २० ओव्हरमध्ये २१४ धावा केल्या होत्या. गुजरातची फलंदाजी झाल्यानंतर पावसानं हजेरी लावली होती. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं बदल करत १७१ धावांचं आव्हान चेन्नईला देण्यात आलं होतं.

फलंदाजांनी करुन दाखवलं

चेन्नई सुपर किंग्जनं दुसऱ्यांदा फलंदाची करताना बदलेल्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. डिवोन कॉन्वे, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा यांच्या खेळीच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरलं. डिवॉन कॉन्वेनं ४७, शिवम दुबेनं ३२ आणि अजिंक्य रहाणेनं २७ आणि जाडेजाच्या १५ धावांच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. जाडेजानं अखेरच्या दोन बॉलमध्ये १० धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार लगावत विजय मिळवला.
Rs 2000 Notes: चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…

धोनीनं सर्वांची मनं जिंकली

महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या ट्रॉफीचं विजेतेपद स्वीकारताना तो ग्रेट का आहे हे दाखवून दिलं. महेंद्र सिंग धोनीनं ट्रॉफी स्वीकारण्यासाठी अंबाती रायडू आणि रवींद्र जाडेजाला बोलावलं. अंबाती रायडूनं अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. अंबाती रायडूसाठी हा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. महेंद्रसिंग धोनीनं ट्रॉफी स्वीकारण्याचा मान अंबाती रायडूला देत मनाचा मोठेपणा दाखवला. धोनीच्या कृतीचं क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. धोनीनं अंबाती रायडूला ट्रॉफी स्वीकारण्याचा मान देत त्याची निवृत्ती अविस्मरणीय करुन दाखवली.

Balu Dhanrokar Passed Away : खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, कुटुंबीयांसह चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा

चेन्नईनं पाचव्यांदा कोरलं विजेतेपदावर नाव

आयपीएलच्या १६ हंगामापैकी चेन्नई सुपरकिंग्जची टीम १४ हंगांमामध्ये सहभागी झाली होती. चेन्नईनं या हंगामापूर्वी ४ वेळा विजेतेपद पटकावलं होतं. पावसामुळं एक दिवस उशिरा झालेल्या सामन्यात चेन्नईनं विजेतेपदकावर नाव कोरलं. तर, गतविजेत्या गुजरात टायटन्सला आयपीएलच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
विजयी चौकार मारल्यानंतर जडेजाला फक्त ही एक गोष्ट करायची होती; सर्वांना चकवा देत पाहा काय केलं

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here