मुंबई : सोमवारी झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा विजय झाला आणि CSK ने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. चेन्नईचा विजय झाल्यानंतर संघाचं सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक केलं जात आहे. संघाला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या रविंद्र जडेजाचंही सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. अशात एका आमदारानेही जडेजाचं कौतुक करत गुजरातविरुद्ध ट्विट केलं आहे.आमदाराने चेन्नई सुपरकिंग्सचं कौतुक केलं असून गुजरातच्या पराभवानंतर त्यांच्याविरुद्ध उपरोधिक ट्विट केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी गुजरात विरोधात खोचक ट्विट करत चेन्नईचं अभिनंदन केलं आहे. राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये जडेजाचं खास कौतुक करत चेन्नई संघाला शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे.

विजयी चौकार मारल्यानंतर जडेजाला फक्त ही एक गोष्ट करायची होती; सर्वांना चकवा देत पाहा काय केलं
गुजरातला गुजरातमध्ये गुजराती भारी पडला…चेन्नई सुपर किंग्सचं अभिनंदन अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी जडेजासह संघाचं अभिनंदन केलं आहे.

गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करत चेन्नई सुपरकिंग्ससमोर २१५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईने तुफानी खेळी करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला, पण नंतर अखेरच्या दोन षटकांत रविंद्र जडेजाने १० धावा करत संघाला विजयपर्यंत पोहोचवलं.

धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे? विजेतेपदानंतर सांगितले भावनिक कारण…
चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. पहिल्यांदा २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ट्रॉफी पटकावली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी २०११ मध्ये, २०१८, २०२१ आणि यंदा २०२३ अशा एकूण पाच वेळा CSKने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here