अहमदाबाद: गेल्या वर्षी आयपीएलच्या गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं यंदा फिनिक्स भरारी घेतली. गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावणाऱ्या चेन्नईनं अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला रोमहर्षक सामन्यात पराभूत केलं. चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपदक पटकावत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. यंदा आयपीएलच्या बाद फेरीत मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं.

अंतिम सामन्यात क्रॉस कनेक्शन पाहायला मिळालं. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभारला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साई सुदर्शननं ९६ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानं ४७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळेच गुजरातला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. पावसामुळे दुसरा डाव १५ षटकांचा करण्यात आला. चेन्नईला १७१ धावांचं आव्हान होतं. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होतं. पहिल्या ४ चेंडूंमध्ये मोहित शर्मानं केवळ ३ धावा दिल्या. पाचव्या चेंडूला रविंद्र जाडेजा स्ट्राईकला होता. २ चेंडूंमध्ये १० धावांची गरज असताना जाडेजानं षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
चेन्नईनं इतिहास रचला, धोनीवर अभिनंदनाचा वर्षाव, अन् विराट कोहलीसह राहुलची ती पोस्ट चर्चेत
साई सुदर्शन आणि रविंद्र जाडेजा यांच्यामुळे आयपीएलच्या अंतिम सामन्यात क्रॉस कनेक्शन पाहायला मिळालं. साई सुदर्शन मूळचा चेन्नईचा आहे. मात्र गुजरातकडून खेळणाऱ्या साईनं चेन्नईच्या संघाची धुलाई केली. त्याच्या खेळीमुळे गुजरातनं २१४ धावांचा डोंगर उभारला. तर दुसरीकडे मूळचा गुजरातचा असलेल्या जाडेजानं गुजरात टायटन्सला धूळ चारण्यात मोलाची भूमिका बजावली. मोहित शर्मा अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करत असताना आणि प्रचंड दडपण असतानाही जाडेजानं शानदार फलंदाजी केली. त्यामुळे गुजरातच्या संघाला गुजरातमध्येच पराभूत व्हावं लागलं. जाडेजा गुजरातच्या सौराष्ट्र भागातून येतो.
ऋतुराज गायकवाडने शेअर केला होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो; फोटोपेक्षा अभिनेत्री सायली संजीवची प्रतिक्रिया चर्चेत
साई सुदर्शनला किती मानधन?
२०२२ मध्ये झालेल्या लिलावात गुजरात टायटन्सनं साईला २० लाखांच्या बेस प्राईजला खरेदी केलं. आयपीएल २०२३ मध्ये त्याला रिटेन करण्यात आलं. यंदाच्या हंगामात साई गुजरातकडून ८ सामने खेळला. त्यात त्यानं ५१.७१ च्या सरासरीनं ३६२ धावा केल्या असून त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तमिळनाडू प्रीमियर लीगमुळे साईला ओळख मिळाली. तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो लाइका कोवई किंग्सकडून खेळला. या संघानं त्याच्यासाठी २१.६० लाखांची बोली लावली होती. मात्र गुजरातनं त्याला त्यापेक्षाही कमी मानधन दिलं.

इंजिनिअरिंग ते एकेकाळचा टेनिस बॉल प्लेअर… मुंबई इंडियन्ससाठी खेळला अन् स्टार बनला

जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे सीएसके किंग
३४ वर्षांचा रविंद्र जाडेजा २०१२ पासून चेन्नईकडून खेळत आहे. सीएसकेसोबत त्यानं तीन जेतेपदं पटकावली आहेत. आयपीएल २०२३ साठी चेन्नईनं जाडेजाला १६ कोटी रुपये देऊन करारबद्ध केलं. गेल्या वर्षी जाडेजाची कामगिरी लौकिकाला साजेशी झालेली नव्हती. मात्र यंदा त्याची कामगिरी अतिशय उत्तम राहिली. १६ सामन्यांत त्यानं २३.७५ च्या सरासरीनं १९० धावा केल्या. तर गोलंदाजीत ७.५६ च्या इकॉनॉमी रेट आणि २१.५५ च्या सरासरीनं २० फलंदाजांना बाद केलं.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here