हार्दिक पांड्याची मोहित शर्माला मिठी
अखेरच्या दोन बॉलमध्ये मॅच हातून निसटल्यानंतर निराश झालेल्या मोहित शर्माला मिठी मारत हार्दिक पांड्यानं कॅप्टन कसा असतो हे दाखवून दिलं. मोहितनं पहिल्या चार बॉलमध्ये केवळ तीन धावा देत संघाला विजयापर्यंत नेलं होतं. आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या मोहित शर्मावर हार्दिक पांड्यानं विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला मोहित शर्मानं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात सार्थ ठरवलं होतं. मोहित शर्मानं पाच धावा देत पाच विकेट काढल्या होत्या.
मोहितच्या त्या कामगिरीच्या जोरावर गुजरातनं अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मोहित शर्मानं चेन्नई विरुद्ध देखील तीन विकेट घेतल्या पण त्याची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही , त्यामुळं निराश झालेल्या मोहितला हार्दिकनं मिठी मारत त्याचं धैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
मॅचसह ट्रॉफी गेली आणि मोहितला रडू कोसळलं…
चेन्नईनं विजय मिळवल्यानंतर गुजरातच्या टीममध्ये शांतता पसरली होती. मोहित शर्मा मॅच गमावल्यानंतर रडू लागला. यानंतर हार्दिक पांड्यानं त्याला मिठी मारत शांत केलं. सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि मोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.मोहित शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केलं होतं. त्यानं या हंगामात १४ सामन्यामध्ये २७ विकेट घेतल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More