भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वाला बरेच काही दिले आहे. त्याचबरोबर धोनीचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्यामुळे धोनीचे निवृत्ती घेतानाचे टायमिंग चुकले, निवृत्ती घेताना त्याने एक गोष्ट करायला हवी होती, असे मत पाकिस्तानचा एका माजी दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू समजले जातात. पण तरीही पाकिस्तानच्या या दिग्गज क्रिकेटपटूच्या मनात धोनीबद्दलचा आदर आपल्याला पाहायला मिळतो.

धोनीच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ साली धोनी कर्णधार असताना भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाला गवसणी घातली होती, त्याचबरोबर धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता, असे म्हटले जाते. त्यामुळे धोनीने अशी निवृत्ती घेणे हे मला पटलेले नाही, असे मत या दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.

धोनी हा आयपीएलसाठी चेन्नईला रवाना झाला होता. धोनी आता आयपीएलचा विचार करत असेल, असे सर्वांनाच वाटले होते. पण धोनीने अनपेक्षितपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का दिला. निवृत्ती घेताना त्याचे टायमिंग चुकले, असे पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूला वाटते. कारण धोनीने अशी निवृत्ती घ्यायला नको होती, असे या क्रिकेटपटूला वाटत आहे.

या क्रिकेटपटुने सांगितले की, ” धोनीचे जगभरात करोडो चाहते आहेत, त्यांना धोनीला क्रिकेटच्या मैदानात पाहायचे आहे. माझ्यामते धोनी गा भारताचा सर्वोत्तम कर्णधार होता. त्यामुळे धोनीने निरोपाचा सामना खेळून निवृत्ती जाहीर करायला हवी होती. कारण जो एक महान क्रिकेटपटू असतो त्याची कारकिर्द मैदानातच संपायला हवी, असे मला तरी वाटते. कारण धोनीला मैदानात पाहण्यासाठी करोडो चाहते आतूर आहेत. त्यामुळे या महान क्रिकेटपटूने मैदानात निवृत्ती घेतली असती तर ते योग्य ठरले असते, असे मला वाटते.”

पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…धोनीने निरोपाचा सामना खेळावा आणि त्याने करोडो चाहत्यांच्या साक्षीने आपली निवृत्ती घ्यावी, असे पाकिस्ताना माजी कर्णधार इंझमाम उल हकला वाटत आहे. कारण धोनीसारख्या महान खेळाडूच्या कारकिर्दीचा शेवट हा क्रिकेटच्या मैदानात व्हायला हवा, असे इंझमामला वाटत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here