अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२३च्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारून ५ विकेटनी ही लढत जिंकली. कर्णधार धोनीची ही आयपीएलमधील २५०वी मॅच होती. सामन्याआधी सर्वांना वाटत होते की ही त्याची अखेरची मॅच असेल आणि तो निवृत्ती जाहीर करेल. पण तसे झाली नाही. धोनीची ही अखेरची मॅच नसली तरी चेन्नई संघात असा एक खेळाडू होता ज्याने फायनल मॅच सुरू होण्याआधी निवृत्तीची घोषणा केली होती.सामना झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात धोनीला जेव्हा अंबाती रायडूबद्दल विचारण्यात आले. तेव्हा धोनी म्हणाला, रायडूबद्दलची पहिली गोष्ट म्हणजे तो मैदानावर फिल्डिंगला असतो तेव्हा १०० टक्के देतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो संघात असताना मी फेअरप्ले अवॉर्ड कधीच जिंकणार नाही. कारण तो पटकन प्रतिक्रिया देतो. त्याला नेहमीच योगदान द्यायचे असते आणि तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. मी त्याला भारत अ दौऱ्यापासून ओळखतो. आम्ही एकत्र खेळलो आहोत. तो असा एक फलंदाज आहे जो फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना खेळू शकतो. ही गोष्ट खूप खास आहे. मी त्याच्यासाठी फार आनंदी आहे. ही मॅच त्याच्या नेहमी लक्षात राहील. तो देखील माझ्यासारखाच आहे, जो फोन जास्त वापरत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे करिअर शानदार होते आणि मला आशा आहे की त्याच्या आयुष्यातील पुढील टप्पा आनंदी असेल.

थरारक विजयानंतर निर्विकार राहिलेल्या धोनीचा बांध फुटला; त्या एका मिठीने डोळ्यात आले पाणी…
रायडूने त्याच्या अखेरच्या आयपीएल सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. त्याने ८ चेंडूत २ षटकार आणि १ चौकारासह १९ धावा केल्या. रायडूने अशा वेळी फटकेबाजी केली जेव्हा चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात मागे पडला होता. चेन्नईला १८ चेंडूत ३८ धावांची गरज असताना रायडूने ३ चेंडूत १६ धावा करून दिल्या. ज्यामुळे विजयाचे लक्ष्य १२ चेंडूत २० असे सोपे झाले.

धोनीला का आणि कोणासाठी आणखी एक वर्ष का खेळायचे आहे? विजेतेपदानंतर सांगितले भावनिक कारण…
३७ वर्षीय अंबाती रायडूने भारताकडून ५५ वनडे आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर २०३ सामन्यात ४ हजार ३४८ धावा आहेत. त्याची सरासरी २८.०५ इतकी तर स्ट्राइक रेट १२७.५४ इतका होता. १०० ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. आयपीएलची ५ विजेतेपदे त्याच्या नावावर आहेत. यातील ३ मुंबई इंडियन्स सोबत तर २ चेन्नई सुपर किंग्जसोबत आहेत. २०१३ साली त्याने भारताकडून झिम्बाब्वेवविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते तर २०१९ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची वनडे खेळली होती.

मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here