आयपीएल २०२३च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीत धोनी पहिल्या चेंडूवर बाद झाला. पण त्यानंतर त्याला तेच मिळाले जे हवं होते. आयपीएलचे पाचवे विजेतेपद! दर वेळी तुम्हाला जे हवं ते मिळेलच असे नाही. कधी कधी आयुष्य हे अधिक दयाशील होते. असे वाटत होते की पाचव्या विजेतेपदासह धोनी निवृत्ती घेईल. मात्र तसे होणार नाही. रविंद्र जडेजाने अखेरच्या दोन चेंडूवर १० धावा केल्या आणि चेन्नईला जसा शेवट पाहिजे होता तसाच झाला. जेव्हापासून आयपीएल अस्तित्वात आले तेव्हापासून सीएसके म्हणजे धोनी आणि धोनी म्हटले की सीएसके होते.
आयपीएलच्या १६व्या हंगामात धोनी अन्य हंगामापेक्षा वेगळा दिसला. गुढघ्याच्या दुखापतीमुळे अनेकदा मैदानावर स्प्रिंट लावताना दिसला. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम असताना त्याला फलंदाजी करण्याची गरज नव्हती. विकेटच्या मागे तो पूर्वी प्रमाणेच आता देखील चमकत होताच. धोनीचे विजेतेपद यासाठी कौतुकास्पद आहे कारण त्याने हे सिद्ध करून दाखवले की सर्वोत्तम संघ नसताना यश मिळवता येते.
CSKसाठी अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वे यांनी टोन सेट करून दिला होता. गायकवाड नेहमीच संघाची ताकद ठरला आहे आणि कॉन्वेने स्फोटक फलंदाजीने कमालकेली. अजिंक्य रहाणेचे करिअर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून जवळजवळ संपले होते. पण चेन्नईने त्याला संघात घेतले आणि संधी दिली. उत्तरादाखल अजिंक्यने १७३च्या स्ट्राइक रेटने ३२६ धावा केल्या आणि भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले.
अंबाती रायडूला यापेक्षा शानदार निरोप मिळाला नसता. हा हंगाम त्याच्यासाठी फार चांगला ठरला नाही. तरी देखील त्याला संधी दिली गेली. १६ सामन्यात त्याने फक्त १५८ धावा केल्या. जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने संघासाठी एक चौकार आणि २ षटकार मारून एका ओव्हरमध्ये मॅचची दिशाच बदलून टाकली.
आणखी एक गोष्ट, आशा आहे की शिवम दुबे स्मार्टवॉच घालणार नाहीत. कारण संपूर्ण दिवस फलंदाजी करून तो १० हजार पावले चालला नाही. कमीत कमी ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता ते पाहता. धावा पळून नव्हे तर चौकार आणि षटकारांनी केल्या जातात असा त्याचा विश्वास आहे. त्याला पाहून युवराज सिंगला अभिमान वाटत असेल. मथीशा पथिरानाने बेबी मलिंगा अशी ओळख निर्माण केली. पण आंतरराष्ट्रीय संघाने त्याला जो मान दिला नाही जो धोनीने दिला आहे.
ही चेन्नईच्या विजयाची स्टोरी आहे, धोनीची स्टोरी आहे. कोणाला आवडो ना आवडो ज्या युगात डेटा विश्लेषक, टेलेंट स्काउट्स आणि अन्य तज्ञ मंडळींचा बोलबाला आहे तेथे धोनी आणि सीएसके अद्याप बेसिक्स आणि प्रोसेसवर काम करण्यावर विश्वास ठेवत आहे. धोनीसाठी हा हंगाम सोपा नव्हता, कारण तो जिथे जात होता तेथे घरचे मैदान होते. फक्त कल्पना करा आणि काही काळ मागे जा… झारखंडचा एक मुलगा चुकून क्रिकेट झाला, खडगपूरमध्ये तिकीट चेक करायचा, रेल्वे स्टेशनवर झोपायचा आता कोट्यवधी लोकांचा हिरो आहे.
धोनीवर अपेक्षांचे इतके ओझे आहे की त्याला अपयश आले असते पण त्याने विश्वास कायम ठेवला. धोनीबाबत असे म्हटले जाते की, तो ज्या गोष्टीला हात लावतो त्याचे सोनं होते. सध्या असे म्हटले जाते की जगातील सर्वोत्तम ऑलराउंडर बेन स्टोक्सच आहे ज्याला चेन्नईचा पुढील कर्णधार मानले जात आहे. त्याने दोन वेळा फलंदाजी करत १५ धावा केल्या. स्टोक्सला लिलावात १६.५ कोटींना खरेदी केले होते. त्याच्या एका रनची किंमत १८० लाख रुपयांना पडली.
मॅचनंतर धोनी म्हणाला निवृत्तीसाठीची यापेक्षा सर्वोत्तम वेळ असू शकत नाही. पण तो हा निर्णय आता घेणार नाही. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाचे रिटर्न गिफ्ट देणार आहे. एकूणच धोनीने पुन्हा दाखवून दिले की, नेतृत्व काय असते. त्याने नव्या खेळाडूंना संधी दिली, जे अपयशाने निराश झाले होते त्यांना हिम्मत दिली आणि ज्यांना सन्मान दिला पाहिजे होता त्यांना शानदार निरोप दिला. याच गोष्टींसाठी तर धोनी ओळखला जातो.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More