मुंबई: ‘बीसीसीआयने आयपीएलचे यंदाचे १३वे पर्व संयुक्त अरब अमिरातीमध्ये () आयोजित करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यामुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान होईल. सध्या देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असताना सुरक्षिततेच्या विशिष्ट नियमांचे पालन करून देशात आयपीएलचे आयोजन झाले तर अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्यामुळे देशातच आयपीएलचे आयोजन करण्याचे निर्देश बीसीसीआयला द्यावेत’, अशा विनंतीची तातडीची जनहित याचिका पुण्यातील वकील अॅड. अभिषेक लागू यांनी केली आहे. याविषयी मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ( Direct to hold )

वाचा:

संसर्गाच्या संकटामुळे आणि देशातील बिकट परिस्थितीमुळे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने २ ऑगस्ट रोजी घेतला. त्यानुसार, केंद्र सरकारच्या आवश्यक मंजुरीनंतर युएईमधील दुबई, शारजा व अबुधाबी स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

वाचा:

‘आयपीएल ही टी-ट्वेंटी या क्रिकेटच्या लोकप्रिय प्रकारातील महत्त्वाची स्पर्धा आहे. त्याचे ब्रँड मूल्य तब्बल ४७५ अब्ज रुपयांचे आहे आणि बीसीसीआयसाठी तो उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक व्यवसायांनाही चालना मिळते. त्यामुळे ही स्पर्धा देशाबाहेर गेल्यास देशाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने अलीकडच्या काळात टप्प्याटप्प्याने लॉकडाउनचे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सुरक्षित वावर व अन्य आवश्यक नियमांसह देशात ही स्पर्धा भरवली जाऊ शकते’, असे म्हणणे लागू यांनी आपल्या याचिकेत मांडले आहे.

वाचा:

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here