लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सराव सुरु केला आहे. यासाठी काही खेळाडू प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सोबत आधीच लंडन गाठले होते. त्यानंतर अन्य खेळाडू आयपीएलचा १६वा हंगाम झाल्यानंतर लंडनमध्ये पोहोचले. कर्णधार रोहित शर्माने सराव सुरु केला आहे. ही लढत ७ जूनपासून द ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर होईल.फायनल मॅचसाठी अद्याप सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा लंडनला पोहोचले नाहीत, हे सर्व खेळाडू आज (१ जून) पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी म्हणजे पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचलला होता. पण न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला. ती लढत साउथम्पटन येथे झाली होती.

WTC फायनलमध्ये भारताविरुद्ध आमचा पराभव होईल; ओव्हलवर दाणादाण उडेल, ऑस्ट्रेलियाला वाटते भीती
भारताचे अधिकतर खेळाडू आयपीएल खेळून इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. संघातील चेतेश्वर पुजारा हा गेल्या काही महिन्यांपासून काउंटी क्रिकेट खेळत आहे. यावेळी परिस्थिती वेगळी असल्याने भारत इतिहास घडवू शकतो अशी आशा आहे. या लढतीमधील खास गोष्ट म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. म्हणजे हे दोन्ही संघ प्रथमच एका त्रयस्थ ठिकाणी कसोटी मॅच खेळतील. याआधी यांच्या लढती भारत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये झाल्या आहेत.

WTC फायनलसाठी भारताला मिळणार ‘इनपूट्स’; रोहितला संघनिवडीसाठी होणार या खेळाडूचा फायदा
भारत सलग दुसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलिया प्रथमच अंतिम फेरीत आला आहे. पण दोघांना पहिल्या जेतेपदाची प्रतिक्षा आहे. दोन्ही संघात आतापर्यंत १०६ कसोटी झाल्या असून त्यात ऑस्ट्रेलियाने ४४, भारताने ३२ सामने जिंकले आहेत. २९ कसोटी ड्रॉ तर एक मॅच टाय झाली.

Dhoni Net Worth: बिझनेस टायकून आहे धोनी; हॉटेल ते एरोस्पेसमध्ये गुंतवणूक, एकूण संपत्ती…
असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशान किशन, केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here