नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रमाणे महेंद्र सिंह धोनीचे करिअर, त्याचे कर्णधापद आणि विकेटकिपिंग यांना वेगळे स्थान आहे. त्याच प्रमाणे त्याच्या निवृत्तीला वेगळे स्थान मिळाले आहे. शनिवारी संध्याकाळी इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत धोनीने निवृत्ती जाहीर केली आणि संपूर्ण क्रिकेट विश्वाला एकच धक्का दिला.

धोनीच्या निवृत्तीची बातमी खरी आहे का हे निश्चित होण्याआधी आणखी एका निवृत्तीची बातमी आली. धोनी पाठोपाठ सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या प्रवासात मी देखील सहभागी होत आहे असे सांगत रैनाने धोनी प्रमाणे इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेतली.

वाचा-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन संघाकडून (टीम इंडिया आणि आयपीएलमधील CSK) खेळणाऱ्या खेळाडूंनी एकाच वेळी निवृत्ती घेण्याची ही पहिली वेळ ठरावी. पण आता धोनीच्या निवृत्तीमुळे फक्त रैना नाही तर आणखी एकाने निवृत्ती घेतली आहे.

धोनीच्या निर्णयानंतर निवृत्ती घेणारी व्यक्ती खेळाडू नसून एक चाहता आहे. कराचीमध्ये जन्मलेले पाकिस्तानी क्रिकेट संघाचे सर्वात मोठे चाहते यांना धोनीच्या निवृतीच्या निर्णयाने खुप दु:ख झाले आहे. बशीर हे ” () नावाने प्रसिद्ध आहेत.

वाचा-
क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित चाहत्यांमध्ये काही चाहते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. त्यामध्ये बशीर यांचा समावेश होतो. बशीर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना चूकवत नाहीत. धोनीच्या निवृत्तीनंतर बशीर यांनी देखील निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

धोनीच्या निवृत्तीनंतर भारत-पाक सामना पाहण्यात काही अर्थ राहिला नाही. शिकागोमध्ये एक रेस्टोरंट चालवणारे बशीर यांना आता रांचीला येऊन एम एस धोनीला भेटण्याची इच्छा आहे.

वाचा-

धोनी सोबत माझी ही निवृत्ती झाली आहे. धोनी यापुढे आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. त्यामुळे मी देखील लांबचा प्रवास करून भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी जाणार नाही. धोनीवर माझे खुप प्रेम आहे आणि त्याच्याकडून मला भरपूर प्रेम मिळाल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक महान खेळाडूला एक दिवशी निवृत्ती घ्यावी लागते. पण धोनीच्या निवृत्तीने मी दुखी झालोय. त्याच्या सोबतच्या अनेक आठवणी माझ्या मनात येतात. पण त्याच्यासाठी एक निरोपाचा सामना झालाच पाहिजे अशी इच्छा बशीर यांनी व्यक्त केली. बशीर यांना २०११ साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोहाली येथील सामन्याचे तिकीट मिळत नव्हते. तेव्हा धोनीने त्यांच्यासाठी तिकीटाची व्यवस्था केली होती. तेव्हापासून बशीर धोनीच्या प्रेमात आहेत.

वाचा-

मी आता लाइव्ह सामना पाहणार नाही. तर रांची येथील घरी जाऊन धोनीची भेट घेईन. जेव्हा करोना परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हा धोनीला नक्की भेटणार असल्याचे ते म्हणाले. आयपीएलसाठी मला भारतात येण्यास आवडेल. पण करोनामुळे प्रवासावर निर्बंध आहेत आणि माझे प्रकृती त्यासाठी परवागी देत नाही. बशीर यांना तीन वेळा हार्ट अटॅक आला आहे. बशीर यांची पत्नी हैदराबादची आहे आणि त्या जानेवारी महिन्यात भारतात आल्या होत्या.

२०१९ मध्ये मी धोनीशी जास्त भेटू शकले नाही. पण एमएसने नेहमी माझ्यासाठी तिकीटाची व्यवस्था केली २०१८च्या आशिया कप स्पर्धेदरम्यान ते मला रुमवर घेऊन गेले आणि जर्सी भेट दिली. त्याआधी धोनीने मला बॅट भेट दिली होती.

वाचा-
बशीर धोनीचे इतके मोठे चाहते झाले की अनेक वेळा त्यांनी भारताला पाठिंबा दिला. यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांना शिवीगाळ केली. काही वेळा त्यांना गद्दार देखील म्हटले गेले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here