अनेक आठवडे चालणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रत्येक दिवशी सहा तास प्रतिस्पर्धा करावी लागले. खेळाडूंकडे ४५ मिनिटाचा वेळ असेल या काळात ते मॅचसाठी स्वत:ला तयार करू शकतील.
युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप (European Sex Championship) मध्ये एकूण १६ प्रकारच्या स्पर्धा होतील, यात मोस्ट अॅक्टीव्ह कलप, Seduction, मसाज आदी गोष्टींचा समावेश आहे. यातील प्रत्येक स्पर्धेतील विजेता कोण असेल याचा निर्णय ३ ज्युरी आणि उपस्थित प्रेक्षकांच्या मतांवर ठरवला जाईल. विजेता ठरवताना ज्युरींचा निर्णय ३० टक्के विचारात घेतला जाईल तर प्रेक्षकांचा निर्णय ७० टक्के विचारात घेतला जाणार आहे. या दोन्ही मतांचे मुल्यांकन करून त्या आधारावर विजेता ठरवला जाणार आहे.
स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्राटिक यांच्या मते सेक्सला एक खेळ अशी मान्यता दिल्याने लोकांमधील मानसिक आणि शारिरिक आरोग्य चांगले होण्यास प्रोत्साहन मिळेल. या शिवाय निषिद्ध मानल्या जाणार्या सेक्सबद्दल लोकांच्या मतांमध्ये उदारता येऊ शकेल. दरम्यान या चॅम्पियनशिपबद्दल स्पर्धकांमध्ये उत्सुकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या स्पर्धेत नेमके कोणते देश सहभागी झाले आहेत याबाबत अद्याप तपशील कळू शकला नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More