नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शनिवारी १५ ऑगस्ट रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल झाल्यानंतर पुन्हा भारतीय संघाकडून खेळेल अशी आशा चाहत्यांना असताना त्यांना सर्वांना धक्का दिला.

वाचा-
वाचा-

धोनीने किमान फेअरवेल मॅच खेळावी अशी मागणी त्याचे चाहते करत आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील रांची येथे धोनीसाठी बीसीसीआयने एका फेअरवेल सामन्याचे आयोजन करावे अशी मागणी केली होती.

वाचा-
धोनी यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसेल पण तो ब्लू जर्सीमध्ये पुन्हा दिसणार नाही. त्यामुळे सर्व चाहत्यांची इच्छा आहे की धोनीने फेअरवेल मॅच खेळावी. अर्थात धोनी अशी मॅच खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. पण चाहत्यांनी मात्र ही मागणी लावून धरली आहे.

वाचा-
भारताच्या या महान खेळाडूने अखेरचा निरोपाचा सामना खेळावा यावर चर्चा सुरू असताना. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने धोनीची फेअरवेल मॅच कोणत्या मैदानावर होईल हे सांगितले. लक्ष्मणला विश्वास वाटतो की धोनीची फेअरवेल मॅच चेन्नईच्या मैदानावर होईल.

वाचा-

धोनीचा जन्म रांचीमधील आहे. पण गेल्या काही वर्षापासून चेन्नईच त्याचे घरचे मैदान झाले आहे. आयपीएलमधील सुपर किंग्ज संघाला २००८ पासून धोनी लीड करतोय. धोनीने चेन्नईला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. चेन्नईत धोनीचा प्रभाव असा काही आहे की त्याला चाहते थाला/ थलाइवा असे म्हणतात.

वाचा-

स्टार स्पोट्सवरील क्रिकेट कनेक्टेडमध्ये बोलताना लक्ष्मण म्हणाला, आपल्या सर्वांना माहित आहे की धोनी सीएसकेशी भावनिक जवळ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली संघ आयपीएलमध्ये यशस्वी ठरला. जोपर्यंत तो क्रिकेट खेळेल तोपर्यंत तो चेन्नईचे नेतृत्व करेल. तो जोपर्यंत मैदानावर दिसेल तोपर्यंत चाहत्यांना आनंद देईल. मला विश्वास वाटतो की धोनीचा अखेरचा सामना चेपॉक मैदानावर होईल.

वाचा-

धोनी जेव्हा सीएसकेसाठी अखेरचा सामना खेळेल तेव्हा तो सामना चेन्नईत होईल. ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकसाठी फेअरवेल मॅच मुंबईत झाली होती. तसाच धोनीसाठी चेपॉक मैदानावर होईल. फक्त भारतीयच नाही तर जगभरातील त्याचे चाहते हा सामना पाहतील, असे लक्ष्मण म्हणाला. धोनी या वर्षी आयपीएल खेळणार आहे. २०२१ मध्ये खेळेल की नाही याबद्दल अद्याप सांगितले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here