लंडन :विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ हे सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फलंदाजांचा विचार केला तर त्यातही या दोघांची नावं आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये कमाल करून दाखवलेली आहे, तर स्मिथला कसोटीत कोणाची टक्करच नाही. ५००० पेक्षा जास्त कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये स्मिथहून अधिक सरासरी फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचीच आहे. विराटच्या नावावर कसोटीत असा विक्रम नाही पण त्याने जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये विराटचा नेहमीत धाक राहिलेला आहे.इंग्लंडमध्ये विराट आणि स्मिथचा कसोटी विक्रम

बहुतेक संघ आपल्या होम ग्राउंडवर किंवा मग विरोधी संघाच्या घरच्या मैदानांवर कसोटी सामने खेळतात. मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC फायनल) अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. ७ जूनपासून दोन्ही संघ ओव्हल मैदानावर भिडतील. अशा परिस्थितीत केवळ इंग्लंडमधील रेकॉर्डला महत्त्व आहे. म्हणूनच विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथचा इंग्लंडमधील रेकॉर्ड कसा आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भरधाव जीपची टक्कर चुकवण्यासाठी वळवताना एसटी बस उलटली, ७ गंभीर जखमी, तर २३ प्रवाशांना लागला किरकोळ मार
विराट कोहली: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडमध्ये १६ कसोटी सामने खेळले आहेत. २०१४ मध्ये विराट पहिल्यांदा इंग्लंडला गेला होता. त्या दौऱ्यातील ५ कसोटीत विराटच्या बॅटमधून केवळ १३४ धावा निघाल्या. विराटने २०१८ च्या दौऱ्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि त्याच्या बॅटने कमाल दाखवली. यावेळी त्याने ५ कसोटीत ५९३ धावा ठोकल्या. २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या ५ कसोटींमध्ये विराटने केवळ २४९ धावा केल्या. २०२१ मध्ये विराटने २०१९-२१ कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही येथे खेळला होता. अशाप्रकारे विराटने १६ सामन्यात ३३.३३ च्या सरासरीने १०३३ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास केला, किरणची दहावीत चमकदार कामगिरी
इंग्लंडमध्ये विराट कोहली – १६ कसोटी, ३१ डाव, १०३३ धावा, ३३.३३ सरासरी, २ शतके, ५ अर्धशतके

स्टीव्ह स्मिथ: स्टीव्ह स्मिथबद्दल बोलायचे तर, परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. विराटप्रमाणे स्मिथनेही इंग्लंडमध्ये केवळ १६ कसोटी सामने खेळले आहेत. लेग-स्पिनर म्हणून त्याने २०१० मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात तो पहिल्या डावात ८व्या क्रमांकावर आणि दुसऱ्या डावात ९व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून एकूण १३ धावा निघाल्या. गोलंदाजीत ३ बळी घेतले. पण त्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. १६ कसोटी सामन्यांच्या ३० डावांमध्ये स्मिथच्या बॅटने इंग्लंडमध्ये १७२७ धावा केल्या आहेत. ५९.५५ च्या सरासरीने. यामध्ये ६ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

तटरक्षक दलाची मोठी कामगिरी; अथांग समुद्रातून बाहेर काढले २० कोटी रुपये किमतीचे सोने, वाचा काय आहे प्रकरण
इंग्लंडमध्ये स्टीव्ह स्मिथ – १६ कसोटी, ३० डाव, १७२७ धावा, ५९.५५ सरासरी, ६ शतके, ७ अर्धशतके

ओव्हल मैदानावरील रेकॉर्ड

ओव्हल मैदानाबद्दल बोलायचे झाले तर, येथेही स्टीव्ह स्मिथचा वरचष्मा आहे. येथे ३ सामन्यांच्या ५ डावात त्याने ९७.७५ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. विराटही येथे केवळ ३ सामने खेळला आहे. त्याच्या बॅटने २८.१६ च्या सरासरीने १६९ धावा केल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here