नवी दिल्ली: गोलंदाजांवर आक्रमकपणे हल्ला चढवणारा भारताचा सलामीवीर रोहित शर्माची पुरस्कार शिफारस. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या समितीने आणि कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यासह ४ खेळाडूंची या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. या आधी सचिन तेंडुलकरला १९९७-९८ साली, त्यानंतर महेंद्र सिंह धोनीला २००७ साली आणि विराट कोहलीला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता. जर रोहितला हा पुरस्कार मिळाला तर तो चौथा क्रिेकटपटू ठरले.

वाचा-
रोहितने २००७ साली आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली होती. त्याने आतापर्यंत कसोटीत ६ वनडेत २९ आणि टी-२० मंध्ये ४ शतक झळकावली आहेत. रोहितने २०१० साली झिम्बब्वेविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात खास अशी कामगिरी न करणाऱ्या रोहितला धोनीने सलामीवीर म्हणून संधी दिली. त्यानंतर रोहितने हिटमॅन अशी ओळख निर्माण केली. त्याने २०१३ साली सर्व प्रथम वनडेत द्विशतक केले. ऑस्ट्रेलियविरुद्ध झळकावलेल्या या पहिल्या द्विशतकानंतर रोहितने आणखी दोन वेळा अशी कामगिरी केली. वनडेत सर्वाधिक ३ द्विशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

वाचा-

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या १२ सदस्यीय समितीने सोमवारी द्रोणाचार्य, ध्यानचंद पुरस्कारासाठी नावांची शिफारस केली. तर मंगळवारी राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी नावांची शिफारस केली.

वाचा-

या निमित्ताने जाणून घेऊयात त्याचे ६ विक्रम …
१] वनडेत रोहितने ३ वेळा द्विशतक झळकावले आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. त्याने २०१४ साली श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या होत्या. वनडेतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकार मारले होते.

२] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वेधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने २०१९ साली एकूण ७७ षटकार मारलेत.

३] एका वर्ल्ड कप स्पर्धेत ५ शतक करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केली नाही.

वाचा-
४] सलामीवीर म्हणून रोहितने एका वर्षात सर्वाधिक १० शतक केली आहेत. त्याने २०१९ साली ही कामगिरी केली. यात वर्ल्ड कपमधील ५ शतकाचा समावेश आहे.

५] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगात ४०० षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने ३५४ सामन्यात ४०० षटकार मारले. क्रिकेटमध्ये ४०० षटकार मारणारा तो फक्त तिसरा फलंदाज आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ५३४ षटकार पहिल्या स्थानावर आहे.

६] टी-२०मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याबाबत रोहित अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत १२७ षटकार मारलेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here