हैदराबाद: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकचे गाड्यांचे प्रेम सर्वांना माहित आहे. सचिनकडे जगातील महाग समजल्या जाणाऱ्या , फेरारी ते जीटी-आर पासून सारख्या गाड्या आहेत. जगातील या सर्वोत्तम गाड्या दारात असून सुद्धा सचिन आनंदी नाही.

वाचा-
फार कमी जणांना ही गोष्ट माहित आहे की, सचिन क्रिकेटपटू झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्या गाडीसाठी आज देखील झुरतोय. स्पोर्ट्स लाइट या शोमध्ये बोलताना सचिनने ही गोष्ट सांगितली.

वाचा-
ज्या कोणी ती गाडी विकत घेतली असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. भावनिक कारणामुले मला ती परत हवी आहे, असे सचिनने सांगितले. क्रिकेटपटू झाल्यानंतर माझी पहिली गाडी होती मारुती ८०० होय. पण दुर्दैवाने ही पहिली गाडी माझ्या सोबत नाही. ती गाडी जर मला परत मिळालील तर खुप आनंद होईल. तर जे लोक ऐकत आहेत त्यांनी विनंती आहे की या संदर्भात तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क करू शकता.

वाचा-

वांद्रे येथील घराच्या बाल्कनीतून लहान वयातच सचिनची गाड्यांची आवड सुरू झाली होती. आता त्याच्याकडे जगातील महाग गाड्या आहेत.

वाचा-

माझ्या घराजवळ एक खुले चित्रपटगृह होते. येथे लोक गाड्या पार्क करायचे आणि त्यावर बसून चित्रपट पहायचे. मी माझ्या भावासोबत घराच्या बाल्कनीतून अनेक तास गाड्या बघत बसायचो अशी आठवण सचिनने सांगितली.

वाचा-
कोणी विकत घेतली आहे हे त्यालाही माहिती नाही. त्यामुळे आता त्याने आवाहन केले आहे की, जर ती गाडी कोणाकडे असेल तर संपर्क करावा. सचिन क्रिकेटपटू झाल्यानंतर विकत घेतलेली ती पहिली गाडी होती. त्यामुळे त्या गाडीशी त्याचे भावनिक नाते आहे. आता सचिनचे हे आवाहन संबंधिक गाडी ज्याच्याकडे आहे त्यापर्यंत पोहोचते का हे पाहावे लागेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here