मुंबई : भारतीय संघाचा आणि आयपीएलमधील चेन्नई संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (माही) याला आज संपूर्ण जग ओळखतं. त्याला आता ‘माही’, ‘थाला’, ‘एमएसडी’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. धोनी जिकडे जाईल, तिकडे चाहते त्याच्याभोवती गराडा घालतात. यावरुन त्याचा चाहतावर्ग किती मोठा आहे, हे दिसून येते.

धोनीला फक्त भारतातच नाही, तर जगभरात देखील प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. धोनी जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तो त्याच्या चाहत्यांचीही खूप काळजी घेतो आणि त्यांना खुश करण्याची संधीही सोडत नाही.


Rinku Singh: रिंकू सिंगसोबत विमानात असं काही घडलं की त्याने थेट हातच जोडले; VIDEO पाहताना चाहतेही घाबरले
धोनीचा असाच एक सुंदर व्हिडिओ सोशल जोरदार मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एमएस धोनी ट्रॅफिक सिग्नलवर अडकल्याचे दिसत आहे. मात्र, तो सेल्फी मागणाऱ्या चाहत्याला निराश करत नाही.

व्हायरल होत असलेला धोनीचा हा व्हिडिओ मुंबईतील आहे. या व्हिडिओत दिसते की, तो एका ट्रॅफिक सिग्नलवर आपल्या कारमध्ये असतो आणि तेव्हाच त्याच्याजवळ एक बाईक येऊन थांबते. बाईक चालक धोनीला कारमध्ये बसल्याचे पाहून त्याच्याकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरतो. यावेळी धोनीही चाहत्याला निराश करत नाही. तो आपल्याचा कारची काच खाली करतो आणि हसत हसत चाहत्याला सेल्फी देतो. धोनीसोबत सेल्फी काढल्यानंतर चाहता भलताच खुश होतो.

चेन्नई संघाचा कर्णधार धोनी आयपीएल २०२३ हंगाम संपल्यानंतर ३१ मे रोजी मुंबईला आला होता. गुरुवारी १ जूनला त्याच्या गुडघ्याची सर्जरी झाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बॉल पकडताना धोनीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, यानंतरही त्याने स्पर्धेतील एकही सामना चुकवला नाही आणि आपल्या संघाला तब्बल पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकून दिली.

द्विशतक करणाऱ्या फलंदाजाला संघाबाहेर ठेवा, ५ पैकी ३ गोलंदाज हे…; गावस्करांचा मोलाचा सल्लाSports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here