मुंबई : भारताचे माजी तडाखेबंद फलंदाज यांनीही चार दिवसांच्या कसोटीच्या नव्या संकल्पनेला विरोध केला आहे. जेव्हा त्यांना या संकल्पनेविषयी मतप्रदर्शन करण्यास सांगितले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती ती ‘हा मूर्खपणा आहे.’ त्यावर सविस्तर बोलताना ते म्हणाले की, सचिन तेंडुलकरनेही कसोटी क्रिकेटची जी समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. मी जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू आहे. कसोटीतील पहिला दिवस हा वेगवान गोलंदाजांचा असतो आणि कसोटी यातच त्या क्रिकेट प्रकाराचे वैशिष्ट्य सामावले आहे. ती विशेषतः या कसोटीला चार दिवसांवर आणून आपण घालवून टाकणार आहोत का?

वाचा-

या क्रिकेट प्रकाराला ‘कसोटी’ असे का म्हणतात? कारण ती प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक कसोटी असते. पहिल्या दिवसापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत खेळाडूची कसोटी लागते. खेळपट्टी बदलत जाते. तुम्हाला उत्तरार्धात फिरकी गोलंदाजीचा सामना करावा लागतो. अर्थात, कसोटी क्रिकेटमध्ये बदल करण्याचा निर्णय आयसीसीचा आहे. पण मला मात्र पाच दिवसांचीच कसोटी असावी असे वाटते.

बोथमही विरोधात

इंग्लंडचा माजी गोलंदाज इयन बोथमने तर कसोटी क्रिकेटचे महत्त्व आपल्या ट्विटर संदेशाद्वारे विषद केले आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सनसनाटी विजय मिळविल्यानंतर त्याने हे ट्विट केले आहे. बोथम म्हणतो की, इंग्लंडचे या विजयाबद्दल कौतुक. हेच खरे क्रिकेट आहे. त्यातच तुमचे कौशल्य, तुमची क्षमता, तुमची ताकद यांची कसोटी लागते. अस्सल खेळाडूंचे ते अस्सल क्रिकेट आहे.

वाचा-

याआधी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनीही चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटला विरोध दर्शविला आहे.

जयवर्धनेला पाच दिवसांची कसोटी पसंत

श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धनेही चार दिवसांच्या कसोटीविरोधात आहे. कसोटी क्रिकेट हे पाच दिवसांचेच असले पाहिजे असे त्यालाही वाटते. खरे तर आयसीसीच्या क्रिकेट समितीचा तो एक भाग आहे, पण ही समिती आता चार दिवसांच्या कसोटीवर चर्चा करणार आहे. त्यात जयवर्धनेची काय भूमिका असेल हे पाहावे लागेल. या समितीचा प्रमुख आहे भारताचा लेगस्पिनर अनिल कुंबळे. मार्च महिन्यात यावर चर्चा होणार आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here