आता ड्रीम इलेव्हन या कंपनीला २२२ कोटी रुपयांमध्ये आयपीएलची स्पॉन्सरशिप देण्यात आलेली आहे. पण ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये चीनची गुंतवणूक असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आयपीएलची स्पॉन्सरशिप पुन्हा वादात सापडली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय पुन्हा आयपीएलची स्पॉन्सरशिप बदलणार का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये चीनच्या एका कंपनीचे समभाग असल्याचे आता पुढे आले आहे. इंटरनेट जायंट टेंसेंट ही चीनची कंपनी असून त्यांचा ड्रीम इलेव्हनमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक आहे. त्यामुळे ज्या कारणांमुळे विवोची स्पॉन्सरशिप गेली होती, त्या कारणांमुळे ड्रीम इलेव्हनची स्पॉन्सरशिपही जाऊ शकते का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणावर बीसीसीआयला नेमके काय वाटते, हे सर्वात महत्वाचे आहे.
ड्रीम इलेव्हनच्या चीनी कनेक्शनवर बीसीसीआयने नेमके काय म्हटले पाहा…ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये चीनची गुंतवणूक आहे, ही गोष्ट पुढे आली होती. त्यावर आता बीसीसीआयने एक खुलासा केल्याचे पाहायला मिळत आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ” इंटरनेट जायंट टेंसेंट, या कंपनीची ड्रीम इलेव्हनमध्ये १० टक्केपेक्षा कमी हिस्सेदारी आहे. त्याचबरोबर ड्रीम इलेव्हन या कंपनीचे संस्थापक हे भारतीय आहेत. त्याचबरोबर ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये जे ४००पेक्षा अधिक लोकं काम करत आहेत, तेदेखील भारतीय आहेत. त्याचबरोबर ड्रीम इलेव्हनमध्ये भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूकही आहे. त्याचबरोबर ड्रीम इलेव्हन हे अॅप भारतातच सर्वाधिक वापरले जाते.”
हा खुलासा दिल्यानंतर बीसीसीाय सध्याच्या घडीला तरी आय़पीएलची स्पॉन्सरशिप बदलण्याचा विचार करत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times