लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच इंग्लंडमध्ये आमनेसामने येत आहेत आणि तेही जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढतीत. साहजिकच या लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. ‘केनिंग्टन ओव्हल’वर ही लढत होणार असून, या मैदानावरील भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर टाकलेला दृष्टिक्षेप…

गेल्या कसोटीत विजय…

केनिंग्टन ओव्हल अर्थात ‘द ओव्हल’वर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चौदा कसोटी सामने खेळला असून, त्यातील सात सामने अनिर्णित राहिले, पाच सामने भारताने गमावले. दोन सामने भारताने जिंकले. त्यातील एक सामना भारताने १९७१मध्ये जिंकला होता, तर दुसरा सामना भारताने २०२१मध्ये जिंकला होता. उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने येथील गेल्या कसोटीत विजय नोंदवला होता.

IND vs AUS: WTC फायनल जिंकायची असेल तर फक्त ही एक गोष्ट करा, इंग्लंडच्या खेळाडूचे भारताला टिप्स

येथील इंग्लंडविरुद्धच्या गेल्या कसोटीत भारताच्या विजयात उमेश यादव (एकूण ६ विकेट), जसप्रीत बुमराह (एकूण ४ विकेट), रवींद्र जडेजा (एकूण ४ विकेट), रोहित शर्मा (११ आणि १२७ धावा), चेतेश्वर पुजारा (४ आणि ६१ धावा), विराट कोहली (५० आणि ४४ धावा), शार्दूल ठाकूर (५७ आणि ६० धावा; तसेच एकूण तीन विकेट) यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

IND vs AUS: WTCची फायनल मॅच २४ तासांवर; विजेतेपदाबाबत कोच राहुल द्रविड स्पष्टच बोलले…

खेळ आकड्यांचा…

६६४ – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारताची सर्वोच्च धावसंख्या. २००७मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ६६४ धावा केल्या होत्या.

९४ – ‘केनिंग्टन ओव्हल’वरील भारताची नीचांकी धावसंख्या. ऑगस्ट २०१४मध्ये इंग्लंडने भारताचा दुसरा डाव ९४ धावांत गुंडाळला होता.

२ – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारताकडून दोन द्विशतके. सुनील गावसकर यांनी १९७९मध्ये या मैदानावर इंग्लंडविरुद्ध २२१ धावांची, तर राहुल द्रविड यांनी २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध २१७ धावांची खेळी केली होती.

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम

१० – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारताकडून दहा शतकांची नोंद. यात राहुल द्रविड (२१७ आणि नाबाद १४६), सुनील गावसकर (२२१), रवी शास्त्री (१८७), लोकेश राहुल (१४९), विजय मर्चंट (१२८), रोहित शर्मा (१२७), ऋषभ पंत (११४), अनिल कुंबळे (नाबाद ११०), कपिल देव (११०) यांच्या शतकांचा समावेश आहे.

११ – ‘केनिंग्टन ओव्हल’वर भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या एकूण सर्वाधिक विकेट. रवींद्र जडेजाने दोन कसोटींत ३१.२७च्या सरासरीने ११ विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कपिल देव यांनी तीन सामन्यांत दहा विकेट घेतल्या आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here