आयपीएच्या या पर्वाला अजून सुरुवातही झालेली नाही. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वीच घमासान पाहायला मिळत आहे. कारण दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने भारताचा गोलंदाज आर. अश्विनला एक वॉर्निंग दिल्याचे पाहायला मिळत आहे.

यंदाच्या आयपीएलला १९ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. आयपीएलचे सामने यावेळी रात्री आठऐवजी साडेसातला सुरु होणार आहेत. पण आयपीएल सुरु होण्यापूर्वीच आजी-माजी खेळाडूंमध्ये आता वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अश्विनला यावर्षी एक गोष्ट करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पॉन्टिंगने घेतलेली आहे.

अश्विनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला एकदा मांकड रनआऊट केले होते. त्यावर पॉन्टिंग नाराज झालेला पाहायला मिळत आहे. कारण ही गोष्ट क्रिकेटसारख्या खेळाला शोभत नाही, असे पॉन्टिंगचे म्हणणे आहेत. त्यामुळे आता अश्विनला मी गोष्ट करायला देणार नाही, असे पॉन्टिंगने म्हटले आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना अश्विनने क्रीझ सोडून पुढे गेलेल्या बटलरला मांकड रनआऊट केले होते. यानंतर एकच वादंग झाला होता. पण मी जे काही केले नियमानुसारच केले, असे अश्विनने म्हटले होते. भारताच्या विनू मांकड यांनी ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन या फलंदाजाला नॉन स्ट्रायकरवर असताना रनआऊट केले होते. ही गोष्ट १९४७ साली घडली होती आणि त्यानंतर या प्रकारच्या रनआऊटला मांकड रनआऊट, असे म्हटले जाऊ लागली.

जेव्हा अश्विनने ही गोष्ट केली होती. त्यावेळी तो किंग्ज इलेव्हन या संघात होता. पण या आयपीएलच्यावेळी अश्विन हा दिल्लीच्या संघात असणार आहे. त्याचबरोबर अश्विनच्या दिल्ली संघाचे प्रशिक्षकपद हे पॉन्टिंगकडे आहे. त्यामुळे पॉन्टिंग आता अश्विनबरोबर काय संवाद साधणार आहे, याबाबत त्याने आपली भूमिका व्यक्त केली आहे.

पॉन्टिंग म्हणाला की, ” अश्विनने जे मांडक रनआऊट केले होते, ते चुकीचे होते, असे मला वाटते. ही गोष्ट खेळभावनेला धरून नाही, असे मला वाटते. त्यामुळे याबाबत अश्विनबाबत मी या गोष्टीवर संवाद साधणार आहे. अश्विन मला सांगेन की, हे नियमाला धरून आहे. पण माझ्या संघात असताना तरी त्याला ही गोष्ट मी करायला देणार नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here