भारतीय संघातील क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला होता. आता चहलच्या भावी पत्नीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हारल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये चहलची भावी पत्नी धनश्री ही ‘दारू बदनाम करदी’ या गाण्यावर झिंगाट डान्स करताना पाहायला मिळाली आहे. धनश्रीचा ‘दारू बदनाम करदी’ या गाण्यावरचा डान्स चाहत्यांना चांगलाच आवडलेला असून त्यामुळे तिच्या या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते आहे.

युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी धनश्रीबरोबर साखरपुडा केला होता. चहलने भावी पत्नीसह फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. त्यानंतर चहलच्या या भावी पत्नीबद्दल सर्वांनी इंटरनेटवर शोध घेण्यास सुरूवात केली. चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा आहे. चहलसोबत साखरपुडा करण्याआधी धनश्री सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. पण याबाबत त्यांनी कोणाला कळू दिले नाही. धनश्री वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. त्याच बरोबर ती यूट्यूबर देखील आहे. स्वत:च्या चॅनलवर ती बॉलिवूड गाण्यांना रिक्रिएट करत असते.

यूट्यूब चॅनवर धनश्री डान्स अकादमीचे व्हिडिओ अपलोड करत असते. या शिवाय ती हिप-हॉपचे ट्रेनिंग देत असते. आता धनश्रीचा विमानतळावर डान्स करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. धनश्रीने विमानतळावर PPE किटमध्ये डान्स केला होता. कुर्ता-पजामा काला-काला असे या पंजाबी गाण्याचे बोल आहेत. धनश्रीच्या या डान्सला मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत. लोक त्यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. तिचे इस्टाग्रामवर जवळ जवळ साडे सात लाख फॉलोअर्स आहेत तर यूट्यूबवर १६ लाख सब्सक्रायबर्स आहेत.

धनश्री आणि चहल यांनी आठ ऑगस्ट रोजी साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला होता. चहलने ही बातमी देत चाहत्यांना सरप्राइझ दिले होते. धनश्री ही मुंबईची असून ती टिकटॉकवर देखील सक्रीय होती. जेव्हा ती एका भारतीय क्रिकेटपटूची पत्नी होणार असे सोशल मीडियावर समजले. तेव्हा तिची लोकप्रियता आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या देखील वाढली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here