लंडन: इंग्लंडमधील द ओव्हल मैदनावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बुधवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरु होईल. भारताने आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळून १० वर्ष झाली. जेतेपदाचा हा दुष्काळ दूर करण्याची टीम इंडिया उत्सुक असेल. तर दुसऱ्या बाजूला आयसीसीच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया स्वत:चा दबदबा अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. भारताने २०१३ साली अखेरचे आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा पराभव करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.धोनीने जिंकून दिलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा ३ वेळा फायनलमध्ये पराभव झाला आहे. तर चार वेळा संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झालाय. भारताने २०२१साली टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळली होती, तेव्हा न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांची इच्छा असेल की संघाने यावेळी विजेतेपद मिळवावे.

IND vs AUS: जेतेपदासाठी लढत ऑस्ट्रेलियाशी; ती खोचक शेरेबाजी संपुष्टात आणण्यासाठी टीम इंडिया उत्सुक

WTC फायनलबाबत…

– ओव्हर मैदानावर प्रथमच जून महिन्यात कसोटी मॅच होत आहे. या मैदानावर जुलै महिन्यापासून कसोटी खेळली जाते.

– भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रथमच एका तिसऱ्या देशात कसोटी मॅच होत आहे.

– रोहित शर्मा हा भारताचा ५वा कर्णधार आहे जो आयसीसीच्या स्पर्धेत देशाचे नेतृत्व करत आहे.

WTC Finalच्या आधी भारतासाठी आली गुड न्यूज; टीम इंडियाने गाजवले आहे ओव्हल मैदान, अखेरच्या…
– याआधी कपिल देव, सौरव गांगुली, धोनी, कोहली यांनी फायनलचे नेतृत्व केले होते.

– मैदानावरील अंपायर्सना निर्णय देण्याआधी सॉफ्ट सिग्नल देता येणा नाही.

फायनल ड्रॉ झाली तर…

अंतिम लढत जर ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर दो्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल.

IND vs AUS: WTC फायनल जिंकायची असेल तर फक्त ही एक गोष्ट करा, इंग्लंडच्या खेळाडूचे भारताला टिप्स
राखीव दिवस

WTC फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. कसोटी मॅच पाच दिवसांची असते पण जर या काळात निकाल लागला नाही किंवा पावसामुळे काही वेळ वाया गेला तर राखीव दिवशी मॅच होईल.

विजेत्याला मिळणार…

या लढतीतील विजेत्या संघाला ट्रॉफीसह १६ लाख डॉलरचे बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ८ लाख डॉलरचे बक्षिस दिले जाईल. जर मॅच ड्रॉ झाली तर विजेता आणि उपविजेत्याची रक्कम एकत्र करून दोन्ही संघांनी समान वाटली जाईल.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here