लंडन: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या अंतिम फेरीची लढत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये आजपासून सुरु होत आहे. आजपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर अंतिम फेरीची लढत सुरु होणार आहे. दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी तयार आहेत. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्या संघामध्ये जोरदार टक्कर होणार आहे. दोन्ही संघांची ताकद आणि कमजोरी आणि संघांचे एक्स फॅक्टर याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे.

भारतीय संघाची ताकद

भारतीय संघाची अंतिम फेरीतल बलस्थान हे जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे आहेत. ओव्हलच्या खेळपट्टीवर दोन्ही अधिक धोकादायक ठरू शकतात. याशिवाय भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये आल्यानं ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. चेतेश्वर पुजारानं काऊंटी क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत तो संघासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो. लंडनमध्ये भारतीय मोठ्या संख्येनं असल्यानं मोठे चाहते देखील मोठ्या संख्येनं दाखल होऊ शकतात.

भारतीय संघाची कमजोरी

भारताचा विकेटकीपर रिषभ पंत जखमी झाल्यानं तो संघाबाहेर आहे. जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल यासारखे दिग्गज खेळाडून टीममध्ये नाहीत. या खेळाडूंचं संघात नसणं भारतासाठी तापदायक ठरू शकतं. रोहित शर्माचं फार्मात नसणं देखील चिंताजनक आहे.

एक्स फॅक्टर- प्रचंड फॉर्ममध्ये असलेला युवा सलामीवीर शुभमन गिल डब्ल्यूटीसीमध्ये फायनल संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. आयपीएलमधील फॉर्म त्यानं कायम ठेवल्यास भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.

विशेष बाब : सध्या भारतीय संघात समावेश असलेल्या कोणत्याही गोलंदाजानं इंग्लंडमध्ये एका डावात पाच विकेट घेतलेल्या नाहीत.
London Weather Report: WTC फायनलमध्ये पाऊस व्हिलन ठरणार? असे आहे लंडनचे हवामान, पुढील ५ पैकी…

ऑस्ट्रेलियाची ताकद

ऑस्ट्रेलियाची ताकद त्यांच्या ऑलराऊंड यूनिटमध्ये आहे. याशिवाय त्यांच्याकडे स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत. ते कोणत्याही वेळी डाव पलटवण्याची क्षमता ठेवतात. याशिवाय सलामीवीर उस्मान ख्वाजा या स्पर्धेत ७० च्या सरासरीनं धावा काढतोय. तो संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क भारतीय फलंदाजांसाठी संकट ठरु शकतो.

कमजोरी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड संघाबाहेर गेला आहे. त्यामुळं त्यांच्यापुढं अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर, मधली फळी दबाव आल्यास चांगली कामगिरी करण्यास असमर्थ ठरु शकते.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना भवनात सर्जिकल स्ट्राईक, ठाकरेंचा हुकमी एक्का लावला गळाला
एक्स फॅक्टर- ऑस्ट्रेलियाचा अनुभवी दिग्गज ऑफ स्पिनर नॅथन लायन फायनलमध्ये संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. भारतीय फलंदाजांना

विशेष बाब- ऑस्ट्रेलियानं १९८५ ते २०१९ पर्यंत द ओवलमध्ये १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ २ सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. तीन कसोटी सामने अनिर्णित झाले तर पाच कसोटी सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे वादंग

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here