लंडनमध्ये सध्या तेलावरून मोठे आंदोलन सुरू आहे. आयसीसीला भिती वाटते की आंदोलनकर्ते स्टेडियममध्ये येऊन पिच आणि मैदान खराब करतील. यामुळेच आयसीसीने दोन पिच तयार करून ठेवले आहेत, जेणेकरून मॅचमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये.
या अटीवर पिच बदलले जाऊ शकते
जर मैदानावरील अंपायर्सना वाटले की ज्या पिचवर मॅच सुरू आहे ती धोकादायक आहे आणि सुरक्षित नाही. तर ते या गोष्टीची माहिती मॅच रेफरींना देतील आणि मॅच थांबवली जाईल. असे झाले तर मैदानावरील अंपायर्स आणि मॅच रेफरी दोन्ही कर्णधारांशी बोलतील. जर दोन्ही कर्णधारांना कोणतीही अडचण नसेल तर मॅच त्याच पिचवर खेळवली जाईल आणि तसे झाले नाही तर अंपायर आणि रेफरी तपासून पाहतील की, पिच ठिक केले जाऊ शकते का?
सर्व गोष्टींचा विचार करून जर पिच ठिक केले जाऊ शकत नसेल तर मॅच रेफरी आयसीसीकडे दुसऱ्या पिचवर मॅच खेळण्या संदर्भात चर्चा करतील. यासाठीची अट म्हणजे दुसरे पिच असे पाहिजे ज्यावर कसोटी मॅच खेळवता येईल. दुसरे पिच खेळण्या योग्य नसेल तर मॅच रद्द केली जाईल.
ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर भारताने सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे. गेल्या वेळी न्यूझीलंडकडून फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. आता यावेळी भारताला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More