लंडन: अखेर प्रतिक्षा संपली, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची मॅच आज बुधवार ७ जूनपासून द ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू होत आहे. दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या आधी रोहित शर्माला टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. गेल्या वेळी भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया WTC Final लाइव्ह अपडेट

> असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीवन स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकिपर), पॅट कमिंस (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड

> असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एस भरत, रविंद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

>भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

> ICC नेमकी कशाची इतकी भीती वाटते ज्यामुळे त्यांनी मॅचसाठी दोन पिच तयार केले. जाणून घ्या कोणत्या परिस्थितीत मॅच सुरू असताना मध्येच पिच बदलले जाऊ शकते.
WTC फायनलसाठी तयार केले दोन पिच, ICCला वाटते या एका गोष्टीची भीती; वेळ आली तर Pitch बदलणार
> तयारी पूर्ण

> ओव्हलवरील भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड
या मैदानावरील दोन्ही संघांचे रेकॉर्ड चांगले नाही. भारताच्या विजयाची सरासरी ०.४०० तर ऑस्ट्रेलियाची ०.४११ इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने ३८ पैकी फक्त ७ तर भारताने १४ पैकी २ कसोटी जिंकल्या आहेत.

> रोहित कधीच पराभूत झाला नाही
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कधीच फायनल मॅच गमावली नाही. २०१८चा आशिया कप, निदाहास ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला रोहितने ५ वेळा विजेतेपद मिळून दिले आहे.

> ११व्यांदा भारत फायनलमध्ये
भारतीय संघ ११व्यांदा आयसीसी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी सात नॉकआउट पैकी पाच मध्ये भारताने तर दोन ऑस्ट्रेलियाने जिंकल्या आहेत. भारताने याआधीच्या आयसीसी स्पर्धेच्या १० पैकी ४ फायनलमध्ये विजय मिळवला आहे. पाच वेळा उपविजेतेपद तर एकदा संयुक्त विजेतेपद मिळवले आहे.

> द ओव्हलपर्यंतचा प्रवास-
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी गेल्या दोन वर्षात प्रत्येकी ६ कसोटी मालिका खेळल्या आहेत. दोघांची या काळातील कामगिरी शानदार अशी ठरली आहे. आता कसोटीचा चॅम्पियन कोण यासाठी हे दोघे लढतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here