सप्टेंबर २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली आता पुन्हा संघात परतला आहे. पहिल्या दोन कसोटींसाठी तो अ‍ॅशेस संघात सामील झाला आहे, असे देशाच्या क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी सांगितले आहे. दरम्यान फिरकी गोलंदाज जॅक लीचला मालिकेतून वगळण्यात आले आहे. ३५ वर्षीय मोईन अलीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खेळाच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपापासून दूर पाऊल टाकले होते. परंतु कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि ईसीबीचे पुरुष व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला आहे.

मोईनने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये ओव्हल येथे भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. त्याने ६४ कसोटींमध्ये २८.२९ च्या सरासरीने २,९१४ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या ऑफ स्पिनने १९५ विकेट्स घेतल्या आहेत. ”आम्ही या आठवड्याच्या सुरुवातीला मोईन अलीशी संपर्क साधला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी काही दिवसांचा विचार करून, मोईन अली संघात सामील होण्यासाठी आणि पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे,” असे रॉब की म्हणाले.
WTC Final: सिराजने अशी केली ख्वाजाची शिकार, विराट कोहली आनंदाने मैदानात धावू लागला, पाहा व्हिडिओ

त्याच्या अष्टपैलू क्षमतेसह त्याच्या अफाट अनुभवाचा आमच्या अ‍ॅशेसमोहिमेला फायदा होईल. इंग्लंडच्या सराव कसोटीत आयर्लंडविरुद्धच्या विजयात चार विकेट घेणार्‍या लीचच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आले आहे. त्याची दुखापत हा इंग्लंडच्या गोलंदाजी विभागाला मालिकेतील सर्वात मोठा धक्का आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही संघातून बाहेर काढण्यात आले आहे. १६ जूनपासून एजबॅस्टन येथे अ‍ॅशेसला सुरुवात होणार आहे.

अ‍ॅशेसच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ:

बेन स्टोक्स (क), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन , जो रूट, जोश टोंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here