विराट-रोहितच्या नावावर मोठा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी मैदानात उतरताच विक्रम केला. भारतासाठी सर्वाधिक आयसीसी फायनल खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. हे दोघेही भारतासाठी ६ ICC फायनल खेळणारे खेळाडू ठरले आहेत. त्याने या प्रकरणात एमएस धोनीलाही मागे टाकले आहे. धोनीने आतापर्यंत ५ आयसीसी फायनल खेळल्या आहेत.
रोहित-कोहलीने हे अंतिम सामने खेळले
विराट कोहली हा २०११ मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळला होता. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ मध्ये T20 वर्ल्ड कप, २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली आणि आता तो WTC २०२३ च्या फायनलचा देखील भाग आहे.
दुसरीकडे, रोहित शर्माबद्दल बोलायचे तर, तो २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कपच्या रुपात पहिला आयसीसी फायनल खेळला होता. यानंतर, तो २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ मध्ये T20 विश्वचषक, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये संघाचा भाग होता, २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हो संघाचा भाग होता, तसेच तो आता २०२३ च्या WTC फायनलमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.
भारतासाठी सर्वाधिक आयसीसी फायनल सामने खेळलेले खेळाडू
भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. २००० मध्ये पहिला ICC फायनल खेळणाऱ्या युवराजच्या नावावर २००२ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ ODI World Cup, २००७ T20 World Cup, २०११ World Cup, २०१४ T20 World Cup आणि २०१७ Champions Trophy यासह ७ ICC फायनल खेळण्याचा विक्रम आहे.
यानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा ६-६ फायनल खेळणारे खेळाडू बनले आहेत. तर एमएस धोनीने ५ आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत. एमएस धोनीने २००७ मध्ये पहिला ICC फायनल खेळला होता. याशिवाय २०११ विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी-२० विश्वचषक आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More