वाचा-
वाचा-
संभाव्य विजेत्या संघांमध्ये चेन्नईचा समावेश होतो. अशातच चेन्नई संघासाठी एक मोठी बातमी आली आहे. संघातील महत्त्वाचा गोलंदाज उद्या (शुक्रवारी) चेन्नई संघासोबत युएईला रवाना होणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरभजनच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने तो सध्या संघासोबत जाणार नाही. हरभजन दोन आठवड्यांनी युएईमध्ये चेन्नई संघासोबत दाखल होईल.
वाचा-
हरभजनने याआधीच चेन्नईत सुरू झालेला पाच दिवसाचे सराव सत्रात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. हरभजन सोबत चेन्नई संघातील रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी देखील या सराव सत्रात भाग घेतला नव्हता.
वाचा-
शार्दुल ठाकूर बुधवारी चेन्नईत दाखल झाला तर रविंद्र जडेजा आज येणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या एमए चिंदबरम मैदानात खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे. संघासाठी मैदानावर दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या.
वाचा-
वाचा-
दरम्यान, चेन्नई संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकारी यांची मंगळवारी घेण्यात आलेली करोना चाचणी नेगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. चेन्नई संघातील खेळाडूंची ही युएईला जाण्याआधीची दुसरी करोना चाचणी होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times