ओव्हल: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये दुसऱ्या दिवशी भारताने ५ बाद १५१ धावा केल्या आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतासमोर फॉलोऑन टाळण्याचे आव्हान असेल. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव ४५९ धावांवर संपुष्ठात आला आणि भारताच्या पहिल्या डावाची सुरूवात झाली.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारताची अवस्था ४ बाद ७१ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. जडेजा ४८ धावांवर बाद झाला. त्याआधी भारताला एक मोठा झटका बसला असता पण नशिब चांगले होते म्हणून संघाला धक्का बसला नाही.

मनाची तयारी ठेवा, टीम इंडियाला पुन्हा उपविजेतेपद; ओव्हल मैदानावर पहिल्याच दिवशी पाहा काय झालं
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मैदानात आलेला अजिंक्य रहाणे १७ धावांवर खेळत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्मधार पॅट कमिन्सच्या एका शानदार चेंडूवर रहाणे LBW झाला. अंपायरने त्याला बाद दिले आणि अंजिक्यने DRS घेण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी अजिंक्यला नशिबाची साध मिळाली आणि पॅट कमिन्सचा गेम झाला.

रिव्ह्यूमध्ये चेंडू टाकताना कमिन्सचा पाय रेषेबाहेर गेल्याचे दिसले, त्यामुळे तो नो बॉल ठरला आणि अजिंक्यला जीवनदान मिळाले. जर बॉल योग्य असता आणि अंपयर्स कॉल घेण्याची वेळ आली असती तर अजिंक्यला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले असते.

स्वत:च्या ट्रॅपमध्ये अडकला भारत; दिग्गज खेळाडूने रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना सुनावले
अजिंक्यने देखील त्याला मिळालेल्या या जीवनदानाचा फायदा घेतला आणि जडेजासोबत संघाचा डाव सावरण्यास मदत केली. कमिन्सकडून झालेली ही छोटी चूक ऑस्ट्रेलियाला महागात देखील पडू शकते. भारत अद्याप ३१८ धावांनी पिछाडीवर आहे आणि मैदानावर अजिंक्य सोबत केएस भरत आहे.


डावाच्या सुरुवातीला भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी फार निराशा केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना ५० धावांची भागिदारी करता आली नाही. शर्मा १५ तर गिल १३ धावांवर माघारी परतले. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळणाऱ्या पुजारा १४ धावा करू शकला. तर विराट कोहली देखील फक्त १४ धावा करून माघारी परतला.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा



Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here