दुबई / नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळण्यास तयार होणार नाही, हे लक्षात घेऊन तेथील चॅम्पियन्स करंडक वन-डे स्पर्धा अन्यत्र खेळवण्याचा विचार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) गांभीर्याने करीत आहे. ही स्पर्धा अमेरिकेत होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत होणारा २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळवण्याचा विचार आयसीसी करीत आहे.भारतातील वन-डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तान बोर्डाने भारताकडून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील सहभागाची लेखी हमी मागितली होती. भारतीय बोर्डाने याकडे दुर्लक्ष केले होते. आता पाकिस्तान बोर्डाने भारतातील वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास मंजूरी दिली आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानला २०२४ च्या चॅम्पियन्स वन-डे स्पर्धेचे यजमानपदावर पाणी सोडणे भाग पाडणार आहे. आयसीसी यासाठी पाक बोर्डाला नुकसान भरपाई देणार आहे.

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम
टी २० वर्ल्ड कपचे संयोजन चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपेक्षा मोठ्या प्रमाणावर होते. इंग्लंडने २०१७ च्या चॅम्पियन्स स्पर्धेतील सर्व लढती बर्मिंगहॅम, ओव्हल आणि कार्डिफ येथे घेतल्या होत्या. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाचा प्रश्न गंभीर नाही, असे आयसीसीचे मत आहे. २०२४ ची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंडमध्ये घेण्याचा विचार आहे. त्याऐवजी अमेरिकेला संयुक्तपणे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमानपद देण्याचा विचार होत आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्त यजमान आहेत.

WTC Finalवर मजबूत पकड तरी ऑस्ट्रेलियाला वाटते भारताची भीती; डोळ्यासमोर येतात ते दोन ऐतिहासिक पराभव
अमेरिका टी-२० वर्ल्ड कपची पूर्वतयारी दाखवण्यासाठी लवकरच क्रिकेट लीग घेणार आहे; मात्र अमेरिकेत वर्ल्ड कप टी-२० खेळवल्यास त्यास मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक लाभण्याची शक्यता कमी आहे. भारतीय उपखंडातील प्राइम टाइमच्या वेळी सामन्यांचे प्रक्षेपण अवघड असेल. त्यामुळे तिथे कमी महत्त्वाची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा खेळवण्याचा विचार होत आहे.

पाकमध्ये स्पर्धा का नको

– पाकिस्तानात कोणत्याही स्पर्धेसाठी जाणार नाही, ही भारतीय क्रिकेट बोर्डाची ठाम भूमिका

– आशियाई स्पर्धेतील एकही लढत पाकमध्ये खेळणार नाही या भूमिकेवर भारत ठाम

– आयसीसीचे मुख्य पुरस्कर्ते भारतातील आहेत. त्यामुळे भारताच्या सहभागाची अनिश्चिततेची टांगती तलवार टाळण्याचा आयसीसीचा प्रयत्न

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here