ओव्हल: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा धाडसाने सामना केला. या दोघांच्या शतकी भागिदारीमुळे भारताने २९६ धावांपर्यंत मजल मारली. तरी देखील टीम इंडिया १७३ धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद १२३ धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाकडे एकूण २९६ धावांची आघाडी असून त्यांच्या हातात ६ विकेट आहेत.

WTC फायनलमध्ये भारत सध्या बॅकफुटवर आहे आणि जर भारताला चॅम्पियन व्हायचे असेल तर इतिहास घडवावा लागेल. याचे कारण म्हणजे लंडनमधील द ओव्हल मैदानावर आजपर्यंत कोणत्याही संघाने इतक्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला नाही. या मैदानावर सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून विजय मिळवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी १९०२ साली २६३ धावां करून कसोटी जिंकली होती. तेव्हा देखील ही लढत इंग्लंडने फक्त १ विकेटनी जिंकली होती.

‘डॉन शार्दूल’ची ब्रॅडमनच्या विक्रमाशी बरोबरी; क्रिकेटच्या इतिहासात फक्त तिसरा फलंदाज ज्याने…
ओव्हल मैदानावरील जर परदेशी संघाच्या कामगिरीचा विचार केला तर ओव्हलवरील विक्रमी विजय वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. त्यांनी १९६३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध २५५ धावांचा पाठलाग फक्त २ विकेटच्या बदल्यात केला होता.

ICC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद बदलणार
भारतीय संघाला ओव्हल मैदानावर असा विक्रम करण्याची संधी होती. १९७९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावरील चौथी कसोटी ओव्हलवर होती. तेव्हा भारताला ४३८ धावांचे टार्गेट मिळाले होते. सुनील गावसकर यांनी चौथ्या डावात २२१ धावा केल्या पण टीम इंडियाला ८ बाद ४२९ धावा करता आल्या. त्यामुळे ही लढत ड्रॉ झाली. जर भारताने तेव्हा विजय मिळवला असता तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तो आज देखील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करुन विजय मिळवल्याचा विक्रम असता. भारताच्या या कामगिरीचा आदर्श रोहित आणि कंपनीला ठेवावा लागणार आहे.

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम
WTC फायनलमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने हेड आणि स्मिथ यांच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४५९ धावा केल्या होत्या.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here