आतापर्यंत बऱ्याच तुफानी खेळी तुम्ही पाहिल्या असाल, पण फक्त ११३ चेंडूंत ३१६ धावांची धडाकेबाज खेळी तुम्ही कदाचित पाहिली नसेल. पण अशी वादळी खेळी साकारल्यानंतरही क्रिकेटपटूवर जोरदार टीका झाल्याचे पाहायला मिळाले. नेमके प्रकरण आहे तरी काय, पाहा…

वाचा-

इंग्लंडचा क्रिकेटपटू ख्रिस हॉलिडेने फक्त ११३ चेंडूंत ३१६ धावांची तुफानी खेळी साकारली. या खेळीमध्ये ३४ षटकार आणि २१ चौकारांचा समावेश होता. ख्रिसच्या या दमदार खेळीमुळेच त्याच्या संघाला ३७८ धावांनी दणदणीत विजयही मिळवता आला. पण या सर्व गोष्टीनंतर ख्रिसवर जोरदार टीका झाल्याचेही पाहायला मिळाले.

वाचा-

ख्रिसची ३१६ धावांची खेळी ही अफलातून अशीच होती. यावेळी ख्रिसला हॉलेंडस्वाईन संघातील एस.पी. सिंहने ६२ धावांची खेळी साकारून चांगली साथ दिली. सिंहने आपल्या ६२ धावांच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार लगावले. ख्रिस आणि सिंह या दोघांनी मिळू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीतील हवाच काढून टाकली होती.

हा सामना एका लीगमध्ये खेळवला गेला होता. ज्यामध्ये सात संघांचा समावेश होता. ख्रिसने ३१६ धावांची खेळी साकारल्यावर बऱ्याच चाहत्यांनी त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. बऱ्याच चाहत्यांनी ख्रिसवर टीका करताना म्हटले की, ” ख्रिस आपल्या खेळीच्या सुरुवातीचा चांगल्या फॉर्मात होता. पण धडाकेबाज फलंदाजी केल्यावर त्याने निवृत्त व्हायला हवे होते.” यावर ख्रिसनेही चाहत्यांना उत्तर दिले आहे. ख्रिसने याबाबत खुलासा करताना सांगितले की, ” संघ व्यवस्थापनाकडूनच मला कायम खेळायला सांगितले होते. त्यामुळे निवृत्तीचा निर्णय मला घेता आला नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here