धोनी हा एक महान कर्णधार आणि क्रिकेटपटू होता. त्याची छाप फक्त क्रिकेट विश्वावरच नव्हती तर उद्योग विश्वावरही त्याने आपली छाप पाडली होती. त्यामुळे आनंद महिंद्रा यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीलाही धोनीची दखल घ्यावी लागली आहे. धोनीला त्यांनी नेमके पहिल्यांदा कधी पाहिले आणि धोनीद्दल ते नेमकं काय म्हणाले, पाहा…
आनंद महिंद्रा यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे की, ” माझ्या आईने पहिल्यांदा धोनीला टिव्हीवर पाहिले आणि धोनीची हेअरस्टाईल मला दाखवली होती. आतापर्यंत धोनीबद्दल बरेच काही म्हटले गेले आहे. धोनीवर भाष्य करण्यासाठी मी काही क्रिकेटमधील तज्ञ नक्कीच नाही. पण धोनीच्या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या अशाच आहे. पहिली गोष्ट म्हणजे धोनी हा अतिशय प्रमाणिक क्रिकेटपटू होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने बऱ्याचदा जोखीम पत्करली होती आणि तो बोल्ड राहायचा. तिसरी गोष्ट म्हणजे तो आपल्या निर्णयांवर ठाम असायचा.”
धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याचे करोडो चाहते आणि बऱ्याच आजी-माजी खेळाडूंना धोनीने पुन्हा एकदा भारताकडून खेळावे, त्याने अखेरचा सामना मैदानात खेळावा आणि निरोप घ्यावा, अशी भावना व्यक्त केली होती. काही जणांनी तर मोदी यांनी जर धोनीला पुन्हा भारताकडून खेळण्याची विनंती केली तर तो नक्कीच खेळेल, असेही म्हटले होते. त्यानंतर मोदी यांचे हे पत्र आले आहे. त्यामुळे मोदी यांनी नेमकं धोनीला काय म्हटलं आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
मोदी यांनी पत्रामध्ये धोनीला म्हटले आहे की, ” धोनी तुझ्यामध्ये ‘न्यू इंडिया’ चा आत्मा दिसतो. ‘न्यू इंडिया’मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबियांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हीडीओ बरंच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावं, हेदेखील समजते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.