यंदाच्या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्स हा संघ पहिल्यांदा दुबईला जाणार होता. पण त्यांच्यावर मात करत एक संघ आज दुबईला आयपीएल खेळण्यासाठी पोहोचला आहे. आयपीएलसाठी दुबईला नेमका कोणता पहिला संघ पोहोचला, पाहा…

यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी खेळाडू २२ ऑगस्टपासून युएईला रवाना होणार होते. युएईला सर्वात पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्सचा संघ पोहोचेल, असे समजत होते. पण त्यांच्यावर याबाबतीत कुरघोडी करत आयपीएलमधील एक संघ दुबईला पोहोचला आहे. आज दुपारी हा संघ दुबईसाठी रवाना झाला. त्यावेळी संघातील खेळाडूंनी दुबईला जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आयपीएलसाठी युएईमध्ये पोहोचण्याचा पहिला मान प्रीती झिंटाची मालकी असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाला मिळाला आहे. आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू हे आयपीएलसाठी आज, गुरुवारी दुबईसाठी रवाना झाले आहेत. संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीसह काही खेळाडूंनी आपल्या विमान यात्रेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयपीएलसाठी पहिल्यांदा युएईमध्ये पोहोचण्याचा मान किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाला मिळाला आहे. यानंतर आता बाकीचे संघ युएईसाठी रवाना होणार आहेत.

यावेळी आयपीएल ही बायो सिक्युएर बबलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आता खेळाडूंना करावे लागणार आहे. बायो सिक्युएर बबलमुळे खेळाडू व्हायरसपासून लांब राहतील. मैदान ते हॉटेल हा प्रवास त्यांचा यामुळे सुखकर होणार आहे. पण जर खेळाडूंनी याबाबतचे नियम मोडले तर त्यांना चांगलीच शिक्षा मिळू शकते.

आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवलेली ड्रीम इलेव्हन या कंपनीचे चीनी कनेक्शन आता समोर आले आहे. आता ड्रीम इलेव्हन या कंपनीला २२२ कोटी रुपयांमध्ये आयपीएलची स्पॉन्सरशिप देण्यात आलेली आहे. पण ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये चीनची गुंतवणूक असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आयपीएलची स्पॉन्सरशिप पुन्हा वादात सापडली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय पुन्हा आयपीएलची स्पॉन्सरशिप बदलणार का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये चीनच्या एका कंपनीचे समभाग असल्याचे आता पुढे आले आहे. इंटरनेट जायंट टेंसेंट ही चीनची कंपनी असून त्यांचा ड्रीम इलेव्हनमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक आहे. त्यामुळे ज्या कारणांमुळे विवोची स्पॉन्सरशिप गेली होती, त्या कारणांमुळे ड्रीम इलेव्हनची स्पॉन्सरशिपही जाऊ शकते का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणावर बीसीसीआयला नेमके काय वाटते, हे सर्वात महत्वाचे आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here