आयपीएल सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना कडक वॉर्निंग दिल्याचे समजते आहे. आयपीएल सुरु झाल्यावर नेमकी जर खेळाडूंकडून चूक झाली किंवा नियम मोडला गेला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बीसीसीआयने नेमकी खेळाडूंना काय ताकिद दिली आहे, पाहा…

वाचा-

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही ताकिद दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही ताकिद फक्त खेळाडूंना देण्यात आलेली नाही, तर खेळाडूंबरोबर कोचिंग स्टाफ, संघ मालक आणि संघाबरोबर असलेल्या सर्व अन्य सदस्यांनाही देण्यात आली आहे

वाचा-

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” यंदाची आयपीएल ही युएईमध्ये होणार आहे, त्याचबरोबर करोनाचेही वातावरण आहे. त्यामुळे आयपीएलशी निगडीत सर्व खेळाडूंसहीत अन्य व्यक्तींनाही नियमांचे कडक पालन करावे लागणार आहे. आपण एखादी चूक करावी किंवा नियम मोडावा आणि त्याचा वाईट परिणाम अन्य कोणावरही व्हावा, हे आम्ही खपवून घेणार नाही.”

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ” आयपीएलसाठी युएई सरकारने सुरक्षिततेसाठी सर्व गोष्टी आपल्याला पुरवलेल्या आहेत. खेळाडू, संघातील प्रशिक्षक आणि संघ मालकांना कुठेही स्वतंत्रपणे फिरता येणार नाही. कारण करोनाच्या केसेस युएईमध्येही आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे कुठे फिरायला गेल्यास करोनाचा धोका संभवतो. फार कमी वेळात युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या गोष्टीचा आदर ठेवायला हवा आणि सर्वांनीच जबाबदारीने वागायला हवे.”

आयपीएल ही बायो सिक्युएर बबलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आता खेळाडूंना करावे लागणार आहे. बायो सिक्युएर बबलमुळे खेळाडू व्हायरसपासून लांब राहतील. मैदान ते हॉटेल हा प्रवास त्यांचा यामुळे सुखकर होणार आहे. पण जर खेळाडूंनी याबाबतचे नियम मोडले तर त्यांना चांगलीच शिक्षा मिळू शकते.

आयपीएलसाठी युएईमध्ये पोहोचण्याचा पहिला मान प्रीती झिंटाची मालकी असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब या संघाला मिळाला आहे. आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबचे खेळाडू हे आयपीएलसाठी आज, गुरुवारी दुबईसाठी रवाना झाले आहेत. संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीसह काही खेळाडूंनी आपल्या विमान यात्रेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयपीएलसाठी पहिल्यांदा युएईमध्ये पोहोचण्याचा मान किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाला मिळाला आहे. यानंतर आता बाकीचे संघ युएईसाठी रवाना होणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here