गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रसारित झालेला कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्यावर जोरदार टीका झाली होती. सोशल मीडियावरून या दोन्ही क्रिकेटपटूंना ट्रोल करण्यात आले होते.
वाचा-
या वादानंतर दोघांवर बीसीसीआयने कारवाई केली होती. कॉफी विथ करण शोमधील हा भाग प्रसारित झाला तेव्हा भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. बीसीसीआयने या दौऱ्यातून दोघांना माघारी बोलवले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या पीएस नरसिंहा यांनी चौकशी करून दोघांवरील निलंबन मागे घेतले होते. बीसीसीआयच्या लोकपाल समितीने हार्दिक आणि राहुल यांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. लोकपालच्या आदेशानुसार दोन्ही खेळाडूंनी पॅरा मिलिटरी फोर्सच्या १० शहिद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख तर तितकीच रक्कम अंधांच्या क्रिकेटसाठी देण्याचे आदेश दिले होते.
वाचा-
गोष्टी आमच्या हातात नव्हत्या…
एक क्रिकेटपटू म्हणून मला कल्पना नव्हती अस काही होईल. चेंडू माझ्या कोर्टात नव्हता. तर अन्य कोणाच्या तरी होता आणि तिथेच निर्णय होणार होता. ती एक अशी अवस्था होती जेथे तुम्ही स्वत:ला कधीच पाहू शकणार नाही, असे हार्दिक म्हणाला.
वाचा-
हार्दिक पांड्या सध्या त्याच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिकने सर्बिरियाची मॉडल नताशा स्टॅन्कोविकसोबत साखरपुडा केला. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी साखरपुडा केला होता. हार्दिक केल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि सध्या तो फिटनेसवर भर देत आहे.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News