चेन्नई : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा आर अश्विन असतो तेव्हा काही तरी नवीन नक्की पहायला मिळते. अश्विन नेहमच काही ना काही नव करत असतो. मग त्याच्या गोलंदाजीतील शैलीत असो की फलंदाजाला रनआऊट करायचे असो, अश्विन प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असतो. आता असाच काहीसा प्रकार त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये केला आहे.टीएनपीएलमध्ये अश्विन डिंडिगुल ड्रॅगन्स संघाचे नेतृत्व करतोय. एका सामन्यात अश्विनने चक्क डीआरएसला डीआरएसने आव्हान दिले. अश्विनच्या या कृतीने सर्वजण हैराण झाले. कारण पहिल्यांदा डीआरएस घेतल्यानंतर थर्ड अंपायरने फलंदाजाला नाबाद दिले होते. त्यावर अश्विनचे समाधान झाले नाही आणि त्याने DRSला आव्हान देण्यासाठी DRS घेतले. अर्थात अश्विनच्या या निर्णयाचा काही फायदा झाला नाही. थर्ड अंपायरने फलंदाजाला दुसऱ्यांदा देखील नाबाद ठरवले.

Rohit Sharma: रोहित शर्माला कर्णधारपद नको होते; एका व्यक्तीच्या दबावामुळे स्विकारली जबाबदारी
DRS वर DRS घेण्याची घटना तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये डिंडिगुल ड्रॅगन्स आणि त्रिची या संघात झालेल्या सामन्यात घडली. मॅचमधील १३व्या षटकात अश्विन गोलंदाजी करत होता. अश्विनच्या चेंडूवर फलंदाज राजकुमारने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. चेंडू बॅटच्या जवळून विकेटकीपरकडे गेला. त्यानंतर कॅचची अपील करण्यात आली. यावर मैदानावरील अंपायरने बाद दिले. कारण चेंडू बॅटच्या जवळून जाताना आवाज झाला होता. प्रत्यक्षात हा आवाज चेंडू बॅटला लागल्याचा नाही तर बॅट जमिनीवर लागल्यामुळे आला होता.

भारतीय गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम; क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झाले नाही, एका चेंडूवर दिल्या १८ धावा

फलंदाजाने मैदानावरील अंपायरच्या निर्णयाविरुद्ध DRS घेतला आणि थर्ड अंपायरने निर्णय बदलला. मात्र अश्विनचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा एकदा DRSची मागणी केली. थर्ड अंपायरने पुन्हा एकदा रिप्ले दाखवला आणि राजकुमारला नाबाद ठरवले.

या लढतीत डिंडिगुलकडून अश्विनने दोन विकेट घेतल्या. ज्यामुळे त्रिचीला फक्त १२० धावा करता आल्या. उत्तरादाखल डिंडिगुलाने फक्त १४.५ षटकात ४ विकेटच्या बदल्यात १२२ धावा केल्या.

BCCIकडून नव्या शोध सुरू; रोहित शर्मानंतर कोण होणार कसोटीचा कर्णधार, या चौघांचे नाव आघाडीवर
नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनलमुळे अश्विन चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या लढतीत भारताने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी असलेल्या अश्विनला संधी दिली नव्हती.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here