विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. आता पुण्यातील सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकण्याचे ध्येय टीम इंडियाचे असेल. जर भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला तर ते टी-२० प्रकारातील पाकिस्तानच्या कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी करतील.
वाचा-
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध १२ टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी १३ सामन्यात विजय मिळवला आहे. या क्रमवारीत पाकिस्ताननंतर अफगाणिस्तान, इंग्लंड आणि भारताचा क्रमांक लागतो. या तिन्ही संघांनी आतापर्यंत एका संघाविरुद्ध प्रत्येकी १२ सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध, इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध तर भारताने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
वाचा-
एका बाजूला भारतीय संघाला पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेच्या नावावर एक नकोसा वाटणारा विक्रमाची नोंद झाली आहे. श्रीलंकेचा आतापर्यंत ६२ टी-२० सामन्यात पराभव झाला आहे. भारताविरुद्ध झालेल्या इंदूर येथील पराभव हा लंकेचा टी-२० मधील ६२वा पराभव ठरला. टी-२०मधील सर्वाधिक पराभवाच्या यादीत वेस्ट इंडिज ६१ पराभवासह दुसऱ्या तर बांगलादेश ६० पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहे.
वाचा-
भारत-श्रीलंका यांच्यातील गुवाहाटी येथील सामना पावसामुळे रद्द झाला होता. लंकेच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News