मलेशियाच्या जोडीविरुद्ध ७ वेळा पराभव झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांना पहिल्यांदा विजय मिळवता आला. इंडोनेशिया ओपनच्या डबल्स इव्हेंटमध्ये भारताचं हे पहिलं विजेतेपद आहे. आरोन चिया आणि सोह वुई यिक यांची जोडी पुरुष डबल्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे.
भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम जिंकला होता. मलेशियाच्या जोडीने सामन्यात सुरुवात आक्रमक केली होती. त्यांच्याकडे आघाडी होती पण पुन्हा मुसंडी मारत भारताच्या जोडीने पुनरागमन केलं. त्यानंतरही लढत अतितटीची झाली. १८ मिनिटात भारतीय जोडीने पहिला सेट जिंकला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More