नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा IPL येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. व्हायरसमुळे मार्च महिन्यात होणारी ही स्पर्धा आता होत आहे. करोना, विवोचे प्रायोजकत्व मागे घेणे आदी अडथळे पार करत अखेर आता आयपीएलला सुरुवात होत आहे.

वाचा-
भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर विवोने प्रायोजकत्व काढून घेतले. त्यानंतर बीसीसीआयने नवा प्रायोजकाचा शोध सुरू केला. या वर्षी ड्रीम ११ ला स्पर्धेचे प्रायोजकत्व मिळाले. या घोषणेनंतर आयपीएलने आपल्या अधिकृत इस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत प्रसिद्ध केले. त्यानंतर स्पर्धेचे सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने देखील हा नवा लोगो शेअर केलाय.

वाचा-

वाचा-

आयपीएलने इस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत नवा लोगो सह विचारले आहे की, आमचा नवा लोगो कसा वाटतोय? या सोबत त्यांनी #Dream11IPL असा हॅशटॅग वापरलाय. ड्रीम ११ कडे ३१ डिसेंबरपर्यंत आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशिपचे अधिकार आहेत.

वाचा-
या वर्षी आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी टाटा सन्स, अनअकॅडमी आणि बायजू सारख्या कंपन्या स्पर्धेत होत्या. पण ड्रीम ११ने २२२ कोटी मोजत स्पॉन्सरशिप मिळवली. भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे या वर्षी संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईमध्ये स्पर्धा होत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here