वाचा-
टीम इंडियाच्या मधळ्या फळीतील फलंदाज विजय शंकरने साखरपूडा केला आहे. त्याने भावी पत्नी सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. विजय शंकरच्या भावी पत्नीचे नाव वैशाली विश्वेश्वरन आहे. विजयने वैशाली सोबतचा फोटो इस्टाग्रामवर शेअर केला असून यात त्याने रिंगची इमोजी शेअर केली आहे. विजयने दोन फोटो पोस्ट केलेत.
वाचा-
विजय आणि वैशाली यांच्या या फोटोवर भारतीय क्रिकेटपटू त्याला शुभेच्छा देत आहेत. केएल राहुल, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, करुण नायर, आर.अश्विन, सिद्धार्थ कौल यांनी या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा-
विजय शंकरच्या आधी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने काही दिवसांपूर्वी साखरपूडा केला होता. चहलने देखील भावी पत्नीचा फोटो सोशळ मीडियावर शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती.
भारतीय संघाकडून खेळताना विजय शंकरने २०१८ साली टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०१९ सालीच मेलबर्न येथे पहिला वनडे सामना खेळला. २०१९च्या वर्ल्ड कपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. अंबाती रायडुच्या जागी त्याला संघात घेण्यात आले होते. याची बरीच चर्चा देखील झाली होती. पण दुखापतीमुळे ते वर्ल्डकपमधून बाहेर झाला.
वाचा-
विजय आयपीएलकडून सनरायझर्स हैदाबाद संघाकडून खेळतो. त्याने IPLमध्ये आतापर्यंत ३३ सामने खेळले असून त्यात ३०.९४च्या सरासरीने ५५७ धावा केल्या आहेत. तर दोन विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.