भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरमुळे महेंद्रसिंग धोनीला संघात स्थान मिळाले नसल्याचा एक धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे. पण नेमकं घडलं तरी काय होतं, पाहा…

धोनीचा भारतीय क्रिकेटमध्ये उदय २००५-०६ साली झाला. त्यानंतर २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला गेला. या विश्वचषकात भारताने सपाटून मार खाल्ला. साखळी फेरीतच भारताला आपला गाशा गुंडाळावा लागला. भारतासाठी हे मोठे अपयश होते. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकही खेळवण्यात येणार होता. त्यावेळी भारताचे वरिष्ठ खेळाडू या विश्वचषकात खेळण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे युवा खेळाडूंचा एक संघ बांधण्यात आला आणि त्याचे कर्णधारपद सचिनच्या सांगण्यावरून धोनीला देण्यात आले होते. पण सचिनमुळेच धोनीला संघात स्थान मिळाले नसल्याचेही आता पुढे आले आहे.

भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर आयपीएलचा लिलाव होणार होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला धोनीला आपल्या ताफ्यात सामील करून घ्यायचे होते. पण त्यावेळी सचिनच्या नावाची मोठी अडचण मुंबई इंडियन्सच्या संघापुढे होती.

याबाबत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी सांगितले की, ” खेळाडू ज्या राज्यात राहतात तिथे त्यांना चांगली लोकप्रियता मिळत असते आणि हेच आयपीएलचे एक गमक आहे. सौरव गांगुली कोलकाता, युवराज सिंग पंजाब, वीरेंद्र सेहवाग दिल्ली आणि सचिन तेंडुलकर मुंबईकडून जर खेळले नसते तर ते चाहत्यांच्या पसंतीस पडले नसते.”

आयपीएलमध्ये धोनीच्या राज्याचा संघ नव्हता. त्यामुळे त्याला कोणत्याही संघात खेळता येऊ शकत होते. धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ आतूर होता. पण त्यांनी त्यापूर्वीच सचिन तेंडुलकरला आपल्या संघात स्थान दिले होते. त्यामुळे सचिनमुळे धोनीला मुंबईच्या संघात स्थान मिळू शकले नाही, असेही म्हटले जाते. कारण सचिनसारखा महान खेळाडू संघात असताना अजून एका मोठ्या खेळाडूला संघात कसे घेता येईल, असा विचार त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने केला असल्याचे म्हटले जाते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here