धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबीरासाठी गेल्या आठवड्यात दाखल झाला होता. त्यानंतर धोनीची करोना चाचणी घेण्यात आली आणि ती निगेटीव्ह आली. त्यानंतर धोनीने सरावाला सुरुवात केली आणि त्याचा फलंदाजीचा सराव सर्वच जण पाहत बसले. कारण धोनीने या सरावामध्ये षटकारांचीच बरसात केल्याचे पाहायला मिळाले.
चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन यांनी सांगितले की, ” सरावामध्ये धोनीची फलंदाजी हा पाहण्यासारखीच होती. कारण नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना धोनीने मैदानाच्या सर्व बाजूंना षटकार ठोकले. त्यामुळे धोनीची सरावातील फलंदाजी पाहताना सर्वांनाच आनंद झाला. धोनीने या सरावात भरपूर षटकार खेचले. धोनीमध्ये फलंदाजी करण्याचा उत्तम आत्मविश्वास यावेळी दिसत होता. आम्हालाही धोनीच्या निवृत्तीबाबत काहीच माहिती नव्हते. इंस्टाग्रामवर जेव्हा त्याचा व्हिडीओ पाहिला तेव्हाच आम्हाला ही गोष्ट समजू शकली.”
धोनीने पाच दिवसांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्टद्वारे धोनीने निवृत्ती घेतली आता भारतीय संघाकडून तो खेळताना दिसणार नाही. तसा ही धोनी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळेच चाहत्यांना त्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे.अशातच चेन्नई सुपर किंग्ज संघाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या धोनीसह आयपीएलमधील सर्व खेळाडू युएईला जात असल्याचे दिसत आहे.
निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनीचा हा पहिला फोटो सोशल मीडियावर आला आहे. नेहमी प्रमाणे धोनी या फोटोत नव्या लुकमध्ये दिसत आहे. धोनीचा लुक कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी धोनीने क्लीन शेव केली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.