आयपीएल खेळण्यासाठी भारतीय खेळाडू आता युएईला रवाना होत आहेत. पण यावेळी भारतीय खेळाडूंचा अवतार पाहाल तर तुम्हीही चकित होऊन जाल, कारण यापूर्वी भारतीय खेळाडूंना या अवतारामध्ये कोणीही बघितलेले नाही.

आयपीएलसाठी युएईमध्ये पहिल्यांदा पोहोचण्याचा मान मिळाला तो किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाला. आज दुपारी पंजाबचा संघ दुबईसाठी रवाना झाला होता. पंजाबच्या खेळाडूंनी आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पंजाबनंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ युएईमध्ये दाखल झालेले आहेत. पण यावेळी बऱ्याच खेळाडूंनी एक खास ड्रेस घातल्याचे पाहायला मिळाले.

सध्याच्या घडीला करोनाचे संकट जगभरात आहे. त्यामुळे करोनापासून वाचण्यासाठी भारतीय खेळाडूंनी हा खास अवतार केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण करनोपासून वाचायचे असेल तर फक्त मास्क लावून चालणार नाही. कारण प्रवास करत असताना करोनाचा धोका जास्त संभवतो. त्यामुळे खेळाडूंनी चक्क पीपीई किट्स घालून युएईला जाण्याचे ठरवले. त्यामुळेच भारतातून युएईला पोहोचेपर्यंत भारतीय खेळाडूंनी पीपीई किट्स घातल्याचे पाहायला मिळाले.

करोनामुळे काही नियम आता युएईमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंना पाळावेच लागणार आहे. खेळाडूंना पहिल्यांदा सहा दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. क्वारंटाइनच्या या काळात तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. करोनाच्या चाचणीमध्ये हे खेळाडू निगेटीव्ह आढळले तर त्याना ‘बायो-बबल’मध्ये प्रवेश दिला जाईल आणि त्यानंतरच त्यांच्या सरावाला सुरुवात होणार आहे.

आयपीएल ही बायो सिक्युएर बबलमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी बरेच कडक नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे पालन आता खेळाडूंना करावे लागणार आहे. बायो सिक्युएर बबलमुळे खेळाडू व्हायरसपासून लांब राहतील. मैदान ते हॉटेल हा प्रवास त्यांचा यामुळे सुखकर होणार आहे. पण जर खेळाडूंनी याबाबतचे नियम मोडले तर त्यांना चांगलीच शिक्षा मिळू शकते. त्यामुळे युएईमध्ये पोहोचल्यावर सर्वच खेळाडूंना आता कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here