नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी एक एक करत संघ युएईमध्ये दाखल होत आहेत. १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी काल तीन वेळा विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ युएईमध्ये दाखल झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाकडे या वर्षी सर्वांचे लक्ष असणार आहे.

वाचा-
धोनीने पाच दिवसांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्टद्वारे धोनीने निवृत्ती घेतली आता भारतीय संघाकडून तो खेळताना दिसणार नाही. तसा ही गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळेच चाहत्यांना त्याला पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

वाचा-
अशातच संघाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या धोनीसह आयपीएलमधील सर्व खेळाडू युएईला जात असल्याचे दिसत आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर धोनीचा हा पहिला फोटो सोशल मीडियावर आला आहे. नेहमी प्रमाणे धोनी या फोटोत नव्या लुकमध्ये दिसत आहे. धोनीचा लुक कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी धोनीने क्लीन शेव केली आहे.

वाचा-

धोनी सोबत भारताचा ऑलराउंडर आणि चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू रविंद्र जडेजा देखील फोटोत दिसतोय. दीपक चाहरने देखील युएईला जाण्याआधीचा फोटो शे्र केला आहे.

वाचा-

वाचा-
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने तीन वेळा विजेतपद मिळवले आहे. भारतीय संघा प्रमाणेच धोनी आयपीएलमध्ये एक यशस्वी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत १७ वेळा मॅन ऑफ मॅच पुरस्कार मिळवला आहे. चेन्नई संघाकडून खेळणारे परदेशी खेळाडू थेट युएईमध्ये येणार आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here