भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबरोबरच १५ ऑगस्टला सुरेश रैनानेही निवृत्ती घेतली होती. रैनाचीही निवृत्ती धक्कादायक होती. कारण निवृत्ती घेण्यासारखे रैनाचे वय झालेले नाही. त्यामुळे रैनाने निवृत्ती मागे घेऊन पुन्हा भारताकडून खेळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रैनाला एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये रैनाने लवकर निवृत्ती जाहीर केली, याबाबत मोदी यांनीही आपले मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर आता माजी क्रिकेटपटूही रैनाने निवृत्ती मागे घ्यावी आणि पुन्हा एकदा भारताकडून खेळावे, अशी मागणी होताना दिसत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा रैनाबाबत म्हणाला की, ” रैना हा आता ३३ वर्षांचा आहे आणि हे काही निवृत्ती घेण्याचे वय नाही. धोनीची एक गोष्ट समजू शकतो की, आता आयपीएलनंतर विश्वचषक होणार नाही आणि त्याला लवकर संधी मिळू शकली नसती. पण जशी शाहिद आफ्रिदीने आपली निवृत्ती परत घेतली होती, तसे रैनाने करून पुन्हा भारताकडून खेळायला हवे. कारण आफ्रिदीनेही निवृत्ती मागे घेऊन तो देशासाठी खेळला होता. त्याचे पुनरागमन चांगलेच गाजले होते. पुनरागमन केल्यानंतर आफ्रिदी भन्नाट फॉर्मात होता. त्यामुळे रैनानेही निवृत्तीचा विचार मागे घ्यावा आणि पुन्हा एकदा देशासाठी खेळावे, असे मला तरी वाटते.”

रैनाने इतक्या लवकर घेतलेल्या निवृत्तीवर पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. ते म्हणाले, तुम्ही इतके युवा आहेत आणि तरी निवृत्ती कशी काय घेतली. १५ ऑगस्ट रोजी तुम्ही आयुष्यातील सर्वात अवघड असा निर्णय घेतला. मी यासाठी निवृत्ती हा शब्द वापरणार नाही. निवृत्त होण्यासाठी तुम्ही अजून लहान आहात आणि तुमच्यात भरपूर ऊर्जा आहे. क्रिकेटच्या मैदानावरील एक शानदार प्रवासानंतर आता आयुष्यातील नव्या डावाला सुरूवात करत आहात.

फक्त एक फलंदाज म्हणून नव्हे तर एक गोलंदाज म्हणून तुम्ही दिलेली योगदान विसरता येणार नाही. तुम्ही एक अशा प्रकारचे गोलंदाज होता. ज्यावर कर्णधार विश्वास ठेवू शकतो. तुमची फिल्डिंग सर्वोत्तम अशी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कॅचवर तुमची छाप आहे. तुम्ही वाचवलेल्या धावांचा हिशोब लावायचा झाला तर अनेक दिवस लागतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here